कडलास ते पुळचा ओढा रस्ता दुरुस्त करा, अन्यथा २६ जानेवारीला तीव्र आंदोलन; ग्रामस्थांचा प्रशासनाला इशारा

0

सांगोला (प्रतिनिधी)- कडलास येथे इंदापूर ते विजापूर या महामार्गावर मौजे कडलास गाव ते पुळचा ओढा हा प्रमुख मार्ग अत्यंत जीवघेणा व धोकादायक झालेला आहे. सदर रस्त्यावर अवजड वाहतुकीचे प्रमाण जास्त असल्याने धुळीचे साम्राज्य वाढले आहे. यामुळे याठिकाणी वास्तव्यास असणाऱ्या नागरिकांना अनेक आजारांना सामोरे जावे लागत आहे.

याठिकाणी रस्ता जीर्ण अवस्थेत असून दररोज प्रवास करणाऱ्या नागरिकांना मोठ्या प्रमाणात गैरसोयीचा सामना करावा लागत आहे. रस्त्यावर खोल खड्डे निर्माण झाले असून विद्यार्थ्यांचा, शेतकऱ्यांचा, महिलांचा व रुग्णवाहिकांचा प्रवास अत्यंत धोकादायक ठरत आहे. गावातील शेतमाल वाहतूक, आपत्कालीन सेवा व दैनंदिन व्यवहार करण्यात अडथळा येत आहेत. रस्त्याची ही अवस्था अनेक वेळा संबंधित विभागाच्या निदर्शनास आणूनही अद्याप कोणतीही कार्यवाही करण्यात आलेली नाही. म्हणून आपण त्वरित या रस्त्याची पाहणी करून कडलास पुळचा ओढा रस्ता दुरुस्तीचे काम तातडीने सुरू करण्याचे आदेश द्यावेत. वरील रस्ता दुरुस्तीची कार्यवाही 25 जानेवारी 2026 पर्यंत न झाल्यास समस्त ग्रामस्थ कडलास यांच्या वतीने 26 जानेवारी प्रजासत्ताक दिनादिवशी लक्षवेधी तीव्र ठिय्या आंदोलन छेडण्यात येईल व तहसील कार्यालयावर भव्य असा आक्रोश मोर्चा काढण्यात येईल. तरी याची संपूर्ण जबाबदारी संबंधित प्रशासनावर राहील असे तहसीलदार यांना दिलेल्या निवेदनात नमूद करण्यात आले आहे.

यावेळी सुनील गायकवाड, सत्यवान लेंडवे, राहुल गायकवाड, नितीन गव्हाणे, दत्तात्रय टापरे, दत्तात्रय जाधव, विजयसिंह गायकवाड, प्रशांत साळुंखे, संतोष जाध, राहुल पाटील, महादेव लेंडवे, दत्तात्रय गायकवाड, सचिन चव्हाण संग्राम गायकवाड, अतुल पाटील, वैभव गायकवाड, विशालगायकवाड, सुरेश केदार, वैभव लेंडवे कोमल पाटील नितीन गायकवाड प्रणव जाधव बापू माने, पांडुरंग ऐवळे, महेश माने, प्रशांत पवार आदी उपस्थित होते.

 

सांगोला परिसर आणि राज्यातील बातम्या आणि माहिती सर्वात प्रथम मिळवण्यासाठी तुमच्या Whatsapp ग्रुपवर 78418 55301 हा आमचा नंबर समाविष्ट करा.
-
'सांगोला लाईव्ह'ला बातम्या व जाहिरात देण्यासाठी आजच संपर्क करा : 78418 55301
-
सोशल मीडियावर फॉलो करा -यूट्यूब, इन्स्टाग्राम आणि फेसबुक

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here