सोनंद (प्रतिनिधी): इ.11 वी मध्ये 2025 -26 या शैक्षणिक वर्षात प्रवेश घेतलेल्या नूतन विद्यार्थ्यांचा स्वागत समारंभ लक्ष्मीदेवी विद्यामंदिर,सोनंद येथे नुकताच संपन्न झाला.या वेळी प्रमुख पाहुणे प्रा. चंद्रकांत इंगळे व अध्यक्षस्थानी संस्था सचिव मा. आनंदराव भोसले होते.

या वर्षी ऑनलाईन प्रवेश प्रक्रियेमुळे 11 वी प्रवेशाचे काम जास्त काळ चालल्यामुळे कार्यक्रम उशिरा घ्यावा लागला. दरवर्षी इ. 12 वी च्या विद्यार्थ्याकडून इ. 11वीत नवीन प्रवेशार्थी विद्यार्थ्यांचे गुलाबपुष्प व भेटवस्तू देऊन स्वागत केले जाते. याप्रसंगी प्रमुख पाहुणे म्हणून बोलताना प्रा.इंगळे सर यांनी विद्यार्थ्यांना आपण या संकुलात शिक्षण घेत आहात. येथील शैक्षणिक सुविधा व शिस्त यावर समाधान व्यक्त करून, अद्यावत प्रयोगशाळा, वर्गखोल्या, सुसज्ज अशी आय. टी. लॅब तसेच ई – लर्निंग सोय इ. मुळे शहरातील शै. वातावरण सोनंद या ठिकाणी असल्याचे प्रतिपादन केले. प्रा. इंगळे सर पुढे बोलताना म्हणाले की, आई, वडील यांच्या कष्टाची जाणीव ठेवा, कुटुंबाचे तुम्ही आधारस्तंभ आहात. आज तुम्ही कष्ट केले तरच तुम्ही भावी जीवनात चांगले जगू शकाल. आणी आई, वडील व गुरु यांच्या ऋणातून उतराई व्हाल. शिक्षक आज जरी तुम्हाला रागावत असले तरी त्यांची त्यामागे चांगली भावना असते. आपला विद्यार्थी वाया जाऊ नये असेच त्यांना वाटत असते. संस्था सचिव मा. आनंदराव भोसले यांनी नुकत्याच झालेल्या शिक्षक दिनाचे औचित्य साधून सर्वच गुरुजनांचा यथोचित आयोजित केला.

या प्रसंगी माजी जि. प. सदस्य मा. नंदकुमार दिघे हेही उपस्थित होते. या कार्यक्रमांसाठी संस्था सदस्या सौ. रजनी भोसले,प्राचार्य हेमंत आदलिंगे, मुख्याध्यापिका सौ.पुष्पा महाकाळ, पर्यवेक्षक श्री. सुभाष आसबे,सौ.सुषमा ढेबे इ. उपस्थित होते. कार्यक्रमासाठी प्रा. आबासाहेब कोळी, प्रा.सौ. वर्षाराणी कोडग, प्रा. अभिजित पवार, सौ. सविता कुंभार, श्री. अमोल केंगार इ.नी विशेष परिश्रम घेतले. यावेळी इ. 11वी, 12वी तील शहाजी पवार, विशाल उतळे, स्नेहल काशीद, गौरी वाघमारे, वैभवी कोळसे,गौरी कोळसे यांनी आपली मनोगते व्यक्त केली. कोमल बाबर व श्री. अनिल गेजगे यांनी सूत्र संचलन केले.
सांगोला परिसर आणि राज्यातील बातम्या आणि माहिती सर्वात प्रथम मिळवण्यासाठी तुमच्या Whatsapp ग्रुपवर 78418 55301 हा आमचा नंबर समाविष्ट करा.
-
'सांगोला लाईव्ह'ला बातम्या व जाहिरात देण्यासाठी आजच संपर्क करा : 78418 55301
-
सोशल मीडियावर फॉलो करा -यूट्यूब, इन्स्टाग्राम आणि फेसबुक


