खिलारवाडी (खोरीमळा) येथे स्व. दादरे साहेब जयंती उत्साहात साजरी

0

सांगोला (प्रतिनिधी):खिलारवाडी खोरीमळा येथे लोणारी समाजाची पितामह स्व. विष्णुपंत दादरे साहेब यांची जयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली. या कार्यक्रमाला समाज बांधवांनी मोठ्या संख्येने उपस्थिती लावली होती.आपल्या लाडक्या नेत्याला सर्वांनीअभिवादन केले.

प्रतिमा पूजन आणि ध्वजाचे पूजन करून कार्यक्रमाची सुरवात भक्तीमय वातावरणात झाली. खोरीमळा येथे स्व. दादरे साहेब यांच्या प्रतिमेचे पूजन आणि झेंड्याचे पूजन लोणारी समाज संघटना सांगोला तालुक्याचे समन्वयक बाबासाहेब खांडेकर यांच्या हस्ते पार पडले. यावेळी उपस्थितांनी दादरे साहेबांच्या स्मृतींना उजाळा दिला.

या जयंती कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी गिते मेजर हे होते. कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्रा. डॉ. दत्तात्रय काळेल सर यांनी केले. त्यांनी आपल्या प्रास्ताविकातून कार्यक्रमाचा उद्देश आणि दादरे साहेबांचे सामाजिक योगदान थोडक्यात मांडले.

कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे बाबासाहेब खांडेकर यांनी आपल्या भाषणात स्व. दादरे साहेब यांचा जीवनप्रवास आणि त्यांचा संघर्षमय कार्यकाळ उपस्थितांसमोर उलगडला. साहेबांच्या विचारांची आजच्या काळात किती गरज आहे, यावर त्यांनी विशेष भाष्य केले.

काव्यातून अभिवादन

यावेळी प्रसिद्ध कवी शंकर खांडेकर यांनी स्व. दादरे साहेब यांच्या जीवनावर आधारित एक हृदयस्पर्शी कविता सादर केली. आपल्या कवितेच्या माध्यमातून त्यांनी साहेबांच्या आठवणींना उजाळा देत उपस्थितांची मने जिंकली.

कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी खोरीमळा येथील तरुणांनी आणि ग्रामस्थांनी विशेष परिश्रम घेतले. या कार्यक्रमासाठी पै. भालचंद्र गोडसे , बाळासाहेब खांडेकर, भारत नरळे सुखदेव खांडेकर, कासलिंग खिलारे यांच्यासह अनेक युवक उपस्थित होते.शेवटी निलेश खांडेकर यांनी उपस्थित सर्व पाहुण्यांचे आणि समाज बांधवांचे आभार मानून कार्यक्रमाची सांगता केली.

सांगोला परिसर आणि राज्यातील बातम्या आणि माहिती सर्वात प्रथम मिळवण्यासाठी तुमच्या Whatsapp ग्रुपवर 78418 55301 हा आमचा नंबर समाविष्ट करा.
-
'सांगोला लाईव्ह'ला बातम्या व जाहिरात देण्यासाठी आजच संपर्क करा : 78418 55301
-
सोशल मीडियावर फॉलो करा -यूट्यूब, इन्स्टाग्राम आणि फेसबुक

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here