सांगोला : सांगोला तालुक्याचे भाग्यविधाते स्व. आमदार डॉ. भाई गणपतराव देशमुख यांच्या चतुर्थ पुण्यस्मरणानिमित्त उद्या बुधवार दि. ३० जुलै रोजी विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे.

स्व. आमदार गणपतराव देशमुख यांच्या पुण्यतिथीनिमित्त सांगोला येथील न्यू इंग्लिश स्कूल व विज्ञान महाविद्यालय येथे विविध कार्यक्रमांचे आयोजन केले आहे. तसेच सूतगिरणी कार्यस्थळावर सकाळी १० ते १२ या वेळेत कर्जत येथील ह.भ.प. ज्ञानेश्वर माऊली पठाडे (महाराज) यांचे भजन, कीर्तन कार्यक्रम आयोजित केला असून दुपारी १२ वाजता पुष्पवृष्टी होणार आहे. यावेळी रतनबाई देशमुख, पोपटराव देशमुख, चंद्रकांत देशमुख, आमदार डॉ. बाबासाहेब देशमुख, डॉ. अनिकेत देशमुख यांची उपस्थिती असणार आहे.

तरी सर्व कार्यकर्त्यांनी उपस्थित राहावे, असे आवाहन शेतकरी कामगार पक्ष व पुरोगामी युवक संघटनेकडून करण्यात आले आहे.
सांगोला परिसर आणि राज्यातील बातम्या आणि माहिती सर्वात प्रथम मिळवण्यासाठी तुमच्या Whatsapp ग्रुपवर 78418 55301 हा आमचा नंबर समाविष्ट करा.
-
'सांगोला लाईव्ह'ला बातम्या व जाहिरात देण्यासाठी आजच संपर्क करा : 78418 55301
-
सोशल मीडियावर फॉलो करा -यूट्यूब, इन्स्टाग्राम आणि फेसबुक




