यश नलवडे यांची शिवसेना युवा सेना तालुका उपप्रमुख पदी निवड

0

सांगोला (प्रतिनिधी): सांगोला तालुक्यातील शिरभावी येथील श्री. यश सचिन नलवडे यांची शिवसेना पक्षाच्या युवा सेना तालुका उपप्रमुख पदी (कार्यक्षेत्र सांगोला ग्रामीण) नियुक्ती करण्यात आली आहे.सदर नियुक्तीचे पत्र मा.आ.शहाजीबापू पाटील यांचेकडून देण्यात आले आहे.

वंदनीय हिंदुहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या आशीर्वादाने व शिवसेना मुख्य नेते श्री. एकनाथ शिंदे (उपमुख्यमंत्री महाराष्ट्र राज्य) यांच्या आदेशानुसार आपली शिवसेना पक्षाच्या युवासेना तालुका उपप्रमुख पदी (कार्यक्षेत्र सांगोला ग्रामीण) नियुक्ती करण्यात येत आहे. सदरचा कालावधी एक वर्षाचा असेल.

वंदनीय हिंदुहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचा हिंदुत्वाचा विचार आणि धर्मवीर आनंद दिघे यांची शिकवण याचा आपण सक्रीयपणे प्रचार आणि प्रसार कराल तसेच शिवसेना पक्ष वाढीसाठी आपण सर्वांना सोबत घेऊन कार्य कराल असा विश्वास असल्याचे नियुक्ती पत्रात नमूद करण्यात आले आहे. शिवसेना पक्षाच्या युवासेना तालुका उपप्रमुख पदी (कार्यक्षेत्र सांगोला ग्रामीण) निवड झालेबद्दल यश नलवडे यांचे सर्वत्र अभिनंदन होत आहे.

सांगोला परिसर आणि राज्यातील बातम्या आणि माहिती सर्वात प्रथम मिळवण्यासाठी तुमच्या Whatsapp ग्रुपवर 78418 55301 हा आमचा नंबर समाविष्ट करा.
-
'सांगोला लाईव्ह'ला बातम्या व जाहिरात देण्यासाठी आजच संपर्क करा : 78418 55301
-
सोशल मीडियावर फॉलो करा -यूट्यूब, इन्स्टाग्राम आणि फेसबुक

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here