सांगोला (प्रतिनिधी): राजकीय आणि सामाजिक क्षेत्रात युवकांना सक्रिय सहभाग घेण्याची संधी मिळाली पाहिजे, असे स्पष्ट मत युवा कार्यकर्ते गणेश खेंडकर यांनी व्यक्त केले आहे. त्यांनी आगामी नगरपालिका व जिल्हा परिषद, पंचायत समिती निवडणुकीत राजकीय पक्षाने तरुणांना प्राधान्य देऊन त्यांना नेतृत्वाची संधी द्यावी, अशी मागणी केली आहे.

खेंडकर यांनी आपल्या भूमिकेचा पुनरुच्चार करताना सांगितले की, “युवकांमध्ये नवी ऊर्जा, आधुनिक विचार आणि समाजाच्या समस्या सोडवण्याची जिद्द असते. जुन्या विचारधारेऐवजी नवा दृष्टिकोन आणण्यासाठी आणि प्रशासनात पारदर्शकता वाढवण्यासाठी तरुणाईला राजकारणात योग्य स्थान मिळणे अत्यंत आवश्यक आहे.” यामुळे लोकशाही प्रक्रिया अधिक बळकट होईल, असे मत त्यांनी मांडले.

शहाजीबापू पाटलांना तरुणाईचा पाठिंबा
या पार्श्वभूमीवर, त्यांनी सांगोला तालुक्यातील राजकीय स्थितीवर भाष्य करताना ते म्हणाले की, सांगोला तालुक्यातील युवक मोठ्या संख्येने माजी आमदार शहाजीबापू पाटील यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवत आहेत. “तालुक्यातील तरुणाई शहाजीबापू पाटील यांच्या कामामुळे प्रभावीत झाली आहे. त्यांनी युवकांचे प्रश्न आणि तालुक्याचा विकास यावर विशेष लक्ष दिल्याने, ते सर्वजण खंबीरपणे शहाजीबापू पाटील यांच्यासोबत उभे आहेत.

सांगोला परिसर आणि राज्यातील बातम्या आणि माहिती सर्वात प्रथम मिळवण्यासाठी तुमच्या Whatsapp ग्रुपवर 78418 55301 हा आमचा नंबर समाविष्ट करा.
-
'सांगोला लाईव्ह'ला बातम्या व जाहिरात देण्यासाठी आजच संपर्क करा : 78418 55301
-
सोशल मीडियावर फॉलो करा -यूट्यूब, इन्स्टाग्राम आणि फेसबुक


