सांगोला (प्रतिनिधी): सांगोला विधानसभा मतदारसंघातील रस्त्यांच्या विकासासाठी आमदार डॉ. बाबासाहेब देशमुख यांच्या सातत्याने केलेल्या पाठपुराव्यामुळे दिघंची जिल्हा हद्द ते खवासपूर-लोटेवाडी-सोनलवाडी-एखतपूर-सांगोला-वाढेगाव-मेडशिंगी आलेगाव-वाकी घेरडी-वाणी चिंचाळे ते भोसे रस्ता राज्य मार्ग ३८६ साठी ३४२ कोटी रुपयांचा निधी मंजूर झाला आहे. हा निधी तालुक्यातील विविध गावांमधील मुख्य रस्त्यांच्या सुधारणेसाठी वापरला जाणार आहे.

महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री ना. देवेंद्र फडणवीस यांच्या कडे आमदार डॉ. बाबासाहेब देशमुख यांनी सदरचा निधी उपलब्ध करून द्यावा ही मागणी अर्थसंकल्पीय अधिवेशनापूर्वी केली होती. या मागणीची दखल घेत मुख्यमंत्री ना. देवेंद्र फडणवीस यांनी तत्काळ निधी मंजूर केला असून निधी मंजूर केल्याबद्दल आमदार डॉ. बाबासाहेब देशमुख यांनी मुख्यमंत्री महोदयांचे आभार मानले.

सदरचा रस्ता हा राज्य मार्ग क्रमांक ३८६ अंतर्गत दिघंची जिल्हा हद्द ते खवासपूर-लोटेवाडी-सोनलवाडी-एखतपूर-सांगोला-वाढेगाव-मेडशिंगी आलेगाव-वाकी घेरडी-वाणी चिंचाळे ते भोसे रस्ता पर्यंत असून या रस्त्यामुळे सांगोला तालुक्यातील शेतकऱ्यांना उत्पादन वाहतुकीसाठी मोठा फायदा होणार आहे. सध्या अनेक गावांमध्ये रस्त्यांची अवस्था खराब असल्याने शेतमाल बाजारात नेणे कठीण होत होते. या विकासकामांमुळे स्थानिक अर्थव्यवस्थेला चालना मिळेल, तसेच पायाभूत सुविधांना चालना मिळणार असून रोजगारात पण वाढ होईल अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.

सदरचा निधी मंजूर केल्याबद्दल मुख्यमंत्री ना. देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री ना. सुनेत्राताई पवार, उपमुख्यमंत्री ना. एकनाथ शिंदे, यांच्यासह ग्रामविकास मंत्री तथा सोलापूर जिल्हा पालकमंत्री ना. जयकुमार गोरे यांचे आमदार डॉ. बाबासाहेब देशमुख यांनी आभार मानले.

सांगोला परिसर आणि राज्यातील बातम्या आणि माहिती सर्वात प्रथम मिळवण्यासाठी तुमच्या Whatsapp ग्रुपवर 78418 55301 हा आमचा नंबर समाविष्ट करा.
-
'सांगोला लाईव्ह'ला बातम्या व जाहिरात देण्यासाठी आजच संपर्क करा : 78418 55301
-
सोशल मीडियावर फॉलो करा -यूट्यूब, इन्स्टाग्राम आणि फेसबुक



