प्रतिनिधी (शशिकांत कोळी):डॉ. बाबासाहेब आंबेडकर शेती विकास संशोधन व गुंज संशोधन संस्था मुबंई. यांच्या संयुक्त विद्यमाने श्रमदान संपन्न झाले. यावेळी झाडांना आळी करणे महिला व पुरुष यांनी केले.100 पेक्षा जास्त महिला व पुरुष उपस्थित होते.
हंगिरगे जिल्हा परिषद शाळेचे मुख्याध्यापक अशोक सावंत सर यांनी श्रमदानाचे महत्व व झाडांचे महत्त्व याबद्दल मार्गदर्शन केले. यावेळी संस्थेचे प्रतिनिधी अनिल जगधने सर, शाळा व्यवस्थापन समितीच्या अध्यक्षा कविता सावंत व बचत गटाच्या अध्यक्ष वर्षा लांडगे, सुलोचना चव्हाण, कल्पना जाधव, अर्चना गरंडे, आधार फाउंडेशनचे अध्यक्ष दिलीप कुंभार, सिद्धनाथ चव्हाण, पोपट सावंत, प्राथमिक आरोग्य केंद्राच्या सेविका मैना माने, भाग्यश्री सावंत, तसेच हंगिरगे गावातील अनेक महिला व पुरुष उपस्थित होते.
दोन्ही संस्थेच्या वतीने श्रमदान करणाऱ्यांना बहुउपयोगी साहित्य वाटप करण्यात येणार आहे,जिल्हा परिषद प्राथमिक शाळा येथील विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य व क्रीडा साहित्य देण्यात येणार आहे. तसेच हंगिरगे परिसरातील सर्व अंगणवाड्यांना शैक्षणिक साहित्य वाटप करण्यात येणार आहे.
सांगोला परिसर आणि राज्यातील बातम्या आणि माहिती सर्वात प्रथम मिळवण्यासाठी तुमच्या Whatsapp ग्रुपवर 78418 55301 हा आमचा नंबर समाविष्ट करा.
-
'सांगोला लाईव्ह'ला बातम्या व जाहिरात देण्यासाठी आजच संपर्क करा : 78418 55301
-
सोशल मीडियावर फॉलो करा -यूट्यूब, इन्स्टाग्राम आणि फेसबुक