भारतीय ज्ञान परंपरेचे संवर्धन काळाची गरज – शितल गांधी

0

रयत शिक्षण संस्थेच्या कला व वाणिज्य महाविद्यालय, माढा येथे पीएम उषा अंतर्गत इतिहास व राज्यशास्त्र विभागाच्या वतीने “भारतीय ज्ञानपरंपरा” या विषयावर एक दिवसीय कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले. या कार्यशाळेत शैक्षणिक, सांस्कृतिक व संशोधनपर विचारांची मुक्त देवाणघेवाण होऊन विद्यार्थ्यांमध्ये भारतीय वारशाबाबत अभिमानाची जाणीव निर्माण झाली.

कार्यशाळेच्या उद्घाटन प्रसंगी प्रमुख पाहुणे श्री. शितल गांधी यांनी भारतीय परंपरेतील ज्ञानाची जागतिक पातळीवरील उपयुक्तता अधोरेखित केली. आधुनिक विज्ञानाच्या प्रगतीसोबतच परंपरेतील तत्त्वज्ञान व मूल्यांचा अभ्यास केला तर ज्ञानाची खरी व्यापकता वाढते, असे ते म्हणाले. अध्यक्षस्थानावरून प्राचार्य डॉ. सुनील हेळकर यांनी कार्यशाळेचे उद्दिष्ट स्पष्ट करताना विद्यार्थ्यांनी आधुनिकतेसोबत परंपरेचाही अभ्यास करावा, असे प्रतिपादन केले.

मार्गदर्शन सत्रात तज्ज्ञ प्राध्यापकांनी विविध पैलूंवर प्रकाश टाकला. डॉ. सतीश कदम यांनी माढा परिसराचा मध्ययुगीन इतिहास व स्थानिक परंपरा यांचे महत्त्व सांगितले. डॉ. गोपाल जोगे यांनी भारतीय कला व वास्तुशास्त्राचे तत्त्वज्ञान मांडत प्राचीन कलेतील तंत्रशुद्धता उलगडली. तर डॉ. सचिन जोशी यांनी पुरातत्त्व व पारंपरिक तंत्रज्ञानाचा वैज्ञानिक दृष्टिकोन विद्यार्थ्यांसमोर मांडला.

समारोपप्रसंगी डॉ. दत्तात्रय मांजरे यांनी भारतीय ज्ञानपरंपरेचा आधुनिक उपयोगितेवर प्रकाश टाकला. सदर कार्यशाळेत प्राचार्य डॉ. बाळासाहेब चव्हाण, प्राचार्य डॉ. तांबे, डॉ. समाधान पवार, डॉ. आर.एन. जाधव, श्री. शहाजीअण्णा साठे, डॉ. रामराजे मोटे आदी सह महाविद्यालयातील शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते. सदर कार्यशाळा यशस्वी होण्यासाठी डॉ. रवीराज कांबळे, डॉ. दत्तात्रय काळेल, डॉ. सतीश घाडगे, महाविद्यालयातील शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांनी योगदान दिले.

सांगोला परिसर आणि राज्यातील बातम्या आणि माहिती सर्वात प्रथम मिळवण्यासाठी तुमच्या Whatsapp ग्रुपवर 78418 55301 हा आमचा नंबर समाविष्ट करा.
-
'सांगोला लाईव्ह'ला बातम्या व जाहिरात देण्यासाठी आजच संपर्क करा : 78418 55301
-
सोशल मीडियावर फॉलो करा -यूट्यूब, इन्स्टाग्राम आणि फेसबुक

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here