आमदार जयंत आसगावकर यांच्या हस्ते सांगोला तालुक्यातील नूतन मुख्याध्यापकांचा सत्कार

0

सांगोला (प्रतिनिधी):    दि.13 सप्टेंबर आमदार जयंत आसगावकर यांच्या हस्ते आज सांगोला तालुक्यातील नूतन मुख्याध्यापकांचा शाल, पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला. सांगोला तालुका मुख्याध्यापक संघाच्या वतीने सिंहगड इन्स्टिट्यूट, कमलापूर येथे हा कार्यक्रम घेण्यात आला.

सुरुवातीला आमदार जयंत आसगावकर यांच्या हस्ते सांगोला तालुका मुख्याध्यापक संघाच्या अध्यक्षपदी रामचंद्र जानकर आणि सचिवपदी प्राचार्य निर्मलकुमार आदलिंगे यांची निवड झाल्याबद्दल सत्कार करण्यात आला. नूतन मुख्याध्यापकांना शुभेच्छा देऊन, आमदार जयंत आसगावकर म्हणाले, मुख्याध्यापक पद हे काटेरी मुकुट आहे. संस्थाचालक व शिक्षक कर्मचाऱ्यांमध्ये समन्वय साधून शाळेचे नियोजनबद्ध व्यवस्थापन मुख्याध्यापक करत असतात. आज शासन मुख्याध्यापकांना रोज नवीन ऑनलाईन कामे देऊन जेरीस आणत आहे. याला आम्ही वेळोवेळी विरोध करत आलो आहे. शिक्षकांना शिकवू द्या, मुलांना शिकू द्या, हेच आमचे धोरण आहे. नूतन मुख्याध्यापकांना काही अडचणी आल्यास त्यांनी थेट मला संपर्क साधावा. तुमचे प्रश्न मार्गी लावणे हेच माझ्या आयुष्याचे ध्येय आहे. यावेळी शिक्षण विस्तार अधिकारी अमोल भंडारी आणि मुख्याध्यापक महामंडळाचे मा. अध्यक्ष सुभाष माने यांनीही आपले मनोगत व्यक्त केले.

यावेळी शिक्षक नेते अण्णासाहेब गायकवाड, सोलापूर मुख्याध्यापक संघाचे कार्याध्यक्ष पी. जे. सावंत, सचिव बापू नीळ व सदस्य विजयकुमार वाघमोडे, मुख्याध्यापक आनंदराव मासाळ, डॉ. ढवळे सर, कृष्णदेव बेहेरे, रेवन आवताडे, कोळवले सर, शितोळे सर आदी उपस्थित होते.

सांगोला परिसर आणि राज्यातील बातम्या आणि माहिती सर्वात प्रथम मिळवण्यासाठी तुमच्या Whatsapp ग्रुपवर 78418 55301 हा आमचा नंबर समाविष्ट करा.
-
'सांगोला लाईव्ह'ला बातम्या व जाहिरात देण्यासाठी आजच संपर्क करा : 78418 55301
-
सोशल मीडियावर फॉलो करा -यूट्यूब, इन्स्टाग्राम आणि फेसबुक

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here