विद्यार्थ्यांचे पाणावले डोळे, जड अंतकरणाने दिला बदली झालेल्या शिक्षकांना निरोप

0

सांगोला (प्रतिनिधी ): सांगोला तालुक्यातील जगदाळेमळा ( शिरभावी) जिल्हा परिषद प्राथमिक शाळेमध्ये कार्यरत असणारे शिक्षक सिताराम बुरांडे व जगन्नाथ खांडेकर सर यांची बदली झाली व निरोप समारंभाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला हा कार्यक्रम म्हणजे गुरु शिष्याचे नातं कसं असतं हा पाहण्याचा योग आला ज्यावेळी बदली झालेली शिक्षक यांना निरोप देऊन त्यांना पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या त्यावेळी त्यांनी जे काम केलं त्या कामाची पोच पावती म्हणजे विद्यार्थ्यांना रडू कोसळ हे पाहून संपूर्ण गाव भावूक झाला.

गेली 7 वर्ष त्यांनी विद्यार्थ्यांच्या बौद्धिक विकास, शाळेतील शंभर टक्के विद्यार्थ्यांना प्रगत करण्याचा प्रयत्न, इंग्रजी व मराठी वाचनाबरोबर सुंदर हस्ताक्षर करण्यावरती भर यासह वीस लाख किमतीचे वर्ग खोल्याचे बांधकाम, निसर्गरम्य शाळा परिसर, सर्वोत्तम शालेय पोषण आहार, अपंग विद्यार्थ्यांना शस्त्रक्रिया व अपंग सर्टिफिकेट त्याचबरोबर अपंग भत्ता मिळवून देण्यात योगदान, कोरोना काळात गरीब पालकांना धान्य वाटप असे अनेक उपक्रम राबवित विद्यार्थी व पालकांचे मन जिंकले अशातच शिक्षकांच्या ऑनलाईन बदली प्रणालीद्वारे या दोन्ही शिक्षकांची बदली झाली आणि जगदाळे मळा येथील विद्यार्थी व पालकांना भावूक होऊन सरांना निरोप द्यावा लागला.

मी माझं कर्तव्य पार पाडले आहे आणि माझ्यानंतरही जे शाळेचे नाव तालुकास्तरावर आहे. ते आलेले नवीन शिक्षक पूर्ण करतील अशी मला अपेक्षा आहे हे बोलत असताना त्यांच्या डोळ्यातून अश्रूच्या धारा लागल्या व त्यांचे बोलणे त्यांनी बंद केले. नोकरी म्हटलं की बदली होणारच पण ज्या शिक्षकांचे कार्य मेहनत शाळेबद्दल असणारा प्रेम गुरु-शिष्यांचा असणारा नातं यांनी जपलं ते जाताना शिष्याला तर त्याचे दुःख होतच पण त्या गावाला सुद्धा त्याचे दुःख होतं असे पाहिलं नाही ते आज गुरु शिष्याचं नातं कसं असतं हे अनुभवायला मिळालं असे मत दोन्ही शिक्षकांनी व्यक्त केले.

सांगोला परिसर आणि राज्यातील बातम्या आणि माहिती सर्वात प्रथम मिळवण्यासाठी तुमच्या Whatsapp ग्रुपवर 78418 55301 हा आमचा नंबर समाविष्ट करा.
-
'सांगोला लाईव्ह'ला बातम्या व जाहिरात देण्यासाठी आजच संपर्क करा : 78418 55301
-
सोशल मीडियावर फॉलो करा -यूट्यूब, इन्स्टाग्राम आणि फेसबुक

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here