सांगोला (प्रतिनिधी) : दीपावलीच्या मंगलमय पर्वाचे औचित्य साधून सांगोला शहरातील ऐतिहासिक ग्रामदैवत श्री अंबिका देवी मंदिर परिसरात मंगळवार, दि. १० नोव्हेंबर २०२६ रोजी भव्य ‘सांगोला दीपोत्सव २०२६’ आयोजित करण्यात आला आहे. मातृभूमी सेवा प्रतिष्ठान आणि ग्रामदैवत श्री अंबिका देवी मंदिर यांच्या संयुक्त विद्यमाने या दीपोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे.

दिवाळी पाडव्याच्या शुभमुहूर्तावर सायंकाळी ६.३० ते रात्री ९ वाजेपर्यंत हा दीपोत्सव उत्साहात साजरा होणार आहे. सांगोला शहराचे श्रद्धास्थान आणि ऐतिहासिक वारसा लाभलेल्या श्री अंबिका देवी मंदिराला दिव्यांच्या मंगलमय रोषणाईने उजळून टाकण्याचा या उपक्रमाचा मुख्य उद्देश आहे.

दीपोत्सवाच्या माध्यमातून भक्ती, परंपरा, संस्कृती आणि सामाजिक एकतेचा सुंदर संगम अनुभवण्याची संधी सांगोलाकरांना मिळणार आहे. दिव्यांच्या प्रकाशाने मंदिर परिसर उजळून निघणार असून, हा सोहळा सांगोला शहरासाठी एक अविस्मरणीय ऐतिहासिक क्षण ठरणार आहे.

हा दीपोत्सव श्री अंबिका देवी मंदिर, विद्यामंदिर हायस्कूलजवळ, सांगोला येथे पार पडणार आहे. या मंगलमय सोहळ्यात शहरातील नागरिक, भाविकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून दीपोत्सवाची शोभा वाढवावी, असे आवाहन आयोजकांच्या वतीने करण्यात आले आहे.


सांगोला परिसर आणि राज्यातील बातम्या आणि माहिती सर्वात प्रथम मिळवण्यासाठी तुमच्या Whatsapp ग्रुपवर 78418 55301 हा आमचा नंबर समाविष्ट करा.
-
'सांगोला लाईव्ह'ला बातम्या व जाहिरात देण्यासाठी आजच संपर्क करा : 78418 55301
-
सोशल मीडियावर फॉलो करा -यूट्यूब, इन्स्टाग्राम आणि फेसबुक



