सरकारने सरसकट पंचनामे करुन शेतकऱ्यांना त्वरित मदत करावी- डॉ. परेश खंडागळे

0

सांगोला (प्रतिनिधी): अतिवृष्टीमुळे राज्यातील शेतकरी संकटात असल्याचं चित्र दिसत आहे. एका बाजूला अतिवृष्टी आणि दुसऱ्या बाजूला पिकांवर पडणारी रोगराई. यामुळे राज्यातील शेतकऱ्यांच्या पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झालं आहे. शेतकऱ्यांची उभी पिकं नष्ठ झाली आहेत. याच मुद्यावरुन डॉ. परेश खंडागळे यांनी मायबाप शेतकऱ्यांसाठी सरकार व प्रशासनाकडे अतिवृष्टी झालेल्या संपूर्ण भागात सरसकट पंचनामे करण्यात यावेत अशी मागणी केली आहे.

त्याबरोबर शेतकरी बांधवांची संपूर्ण कर्जमाफी करावी, ओला दुष्काळ जाहीर करण्यात यावा, नुकसान भरपाई ची अनुदान रक्कम वाढवून मिळावी, शेतकरी बांधवांची सर्व कर्जांची बँक वसुली व शैक्षणिक तसेच महसूल कर वसुली थांबवावी, दसरा व दिवाळी सण जवळ आल्याने शेतकऱ्यांना दिवाळीसाठी एक विशेष दिवाळी पॅकेज व किट देण्यात यावे,जी जनावरे दगावली आहेत त्यासाठी योग्य तो मोबदला मिळावा, अतिवृष्टीमुळे विजेच्या उपकरणांचे नुकसान झालेले आहे त्यासाठी योग्य ती मदत मिळावी, विद्युत मंडळांना सांगून लवकरात लवकर लाईटचे पोल व डीपी ची कामे करण्यात यावे, घरांचे जे नुकसान झालेले आहे तेथे तत्काळ योग्य ती मदत देण्यात यावी या मागण्या केल्या आहेत.

सांगोला परिसर आणि राज्यातील बातम्या आणि माहिती सर्वात प्रथम मिळवण्यासाठी तुमच्या Whatsapp ग्रुपवर 78418 55301 हा आमचा नंबर समाविष्ट करा.
-
'सांगोला लाईव्ह'ला बातम्या व जाहिरात देण्यासाठी आजच संपर्क करा : 78418 55301
-
सोशल मीडियावर फॉलो करा -यूट्यूब, इन्स्टाग्राम आणि फेसबुक

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here