आलदर हॉस्पिटलच्या वतीने गोडसेवाडी येथे मोफत आरोग्य तपासणी शिबिर संपन्न

0

सांगोला (प्रतिनिधी ): डॉ. महावीर आलदर यांच्या आलदर हॉस्पिटलच्या वतीने नवरात्री निमित्त गोडसेवाडी (कमलापूर) येथे आज दि.1 ऑक्टोबर रोजी बालकांचे मोफत आरोग्य तपासणी व मोफत औषध उपचार शिबिर आयोजित करण्यात आले होते.

या शिबिराचा 90रुग्णांनी लाभ घेतला. यावेळी डॉ. महावीर आलदर यांनी महात्मा ज्योतिराव फुले जनआरोग्य योजना व आयुष्मान भारत प्रधानमंत्री जनआरोग्य योजनेच्या संदर्भात रुग्णांना व त्यांच्या पालकांना आरोग्यांविषयी माहिती दिली.

तसेच यावेळी त्यांनी लहान बालकांना होणारे आजार व घेण्याची काळजी व आलदर हॉस्पिटल मधे नवजातशिशु अतिदक्षता विभाग, लहान बाळासाठी अतिदक्षता विभाग व सर्जरी विभागातील रुग्णांसाठी आलदर हॉस्पिटल हे २४ तास आपल्या सेवेत तयार आहे. गरीब व गरजू रुग्णांनी योजनेचा लाभ घ्यावा असे आवाहन करत सध्या योजनेअंतर्गत गरीब व गरजू रुग्णांचा भरपूर फायदा होत असल्याचे त्यांनी सांगितले.

यावेळी साधू गोडसे (मा. सरपंच), ग्रामसेवक संजय खटकाळे, विपुल गोडसे,विलास गोडसे,अमोल गोडसे,रोहन गोडसे,आबासो गोडसे, सचिन गोडसे, मनोज पवार, तसेच शिक्षक लक्ष्मी कारंडे मॅडम, रामचंद्र तंडे सर, दिगंबर पाटील सर, ग्रामस्थ,पालक मोठ्या संख्येने उपस्थित होते.सर्व ग्रामस्थांनी डॉ.महावीर आलदर, स्टाफ नितीन भोसले, सुनिल बुरुंगे यांचे आभार मानले.

सांगोला परिसर आणि राज्यातील बातम्या आणि माहिती सर्वात प्रथम मिळवण्यासाठी तुमच्या Whatsapp ग्रुपवर 78418 55301 हा आमचा नंबर समाविष्ट करा.
-
'सांगोला लाईव्ह'ला बातम्या व जाहिरात देण्यासाठी आजच संपर्क करा : 78418 55301
-
सोशल मीडियावर फॉलो करा -यूट्यूब, इन्स्टाग्राम आणि फेसबुक

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here