सांगोला (प्रतिनिधी): सांगोला शहरात आज पक्ष प्रवेशाच्या रॅली दरम्यान सांगोला तालुक्याचे भाग्यविधाते स्व. गणपरावजी देशमुख यांच्या घरावर अज्ञात व्यक्तिकडून भ्याड हल्ला करण्यात आला. या अज्ञात हल्लेखोरावर त्वरित कारवाई करावी या मागणी साठी आज शेतकरी कामगार पक्षाकडून तहसीलदार संतोष कणसे साहेब व सांगोला पोलिस स्टेशन चे काशीद साहेब यांना निवेदन देण्यात आले.

हल्लेखोरांवर त्वरित कारवाई करण्यात यावी अशी मागणी करण्यात आली. या हल्ल्याचा सांगोला शहर व तालुक्यातील सुज्ञ जनतेकडून तीव्र निषेध करण्यात आला असून शेतकरी कामगार पक्षाकडून उद्या शनिवारी सांगोला बंद ची हाक देण्यात आलेली आहे.

सांगोला परिसर आणि राज्यातील बातम्या आणि माहिती सर्वात प्रथम मिळवण्यासाठी तुमच्या Whatsapp ग्रुपवर 78418 55301 हा आमचा नंबर समाविष्ट करा.
-
'सांगोला लाईव्ह'ला बातम्या व जाहिरात देण्यासाठी आजच संपर्क करा : 78418 55301
-
सोशल मीडियावर फॉलो करा -यूट्यूब, इन्स्टाग्राम आणि फेसबुक


