ठळक बातम्या – 12/10/2025

0

✒️ इतिहासातील सर्वात मोठी थाप फडणवीसांनी मारली

▪️संभाजीनगरमधील हंबरडा मोर्चातून उद्धव ठाकरेंचा हल्लाबोल

✒️ कबुतरामुळं महायुतीचं सरकार जाईल, जैन साधू निलेश मुनींचा इशारा

▪️जन कल्याण पार्टीची स्थापना, कबुतर राहणार पक्षाचं चिन्ह

✒️ संग्राम जगतापांची मुस्लिमविरोधी भूमिका मान्य नाही, कारणे दाखवा नोटीस पाठवणार;

▪️वादग्रस्त वक्तव्यावर अजित पवारांचा दम

✒️ मी मदत केली म्हणूनच तुम्ही आमदार झालात, मंत्री जयकुमार गोरेंचा शेकापचे आमदार बाबासाहेब देशमुखांना टोला

▪️शहाजीबापूंचा गेम भाजपनेच केल्याची चर्चा

✒️ पंतप्रधान नरेंद्र मोदींकडून शेतकऱ्यांना दिवाळी गिफ्ट

▪️35 हजार 440 कोटींच्या दोन नवीन योजनांची घोषणा

✒️ चीनवर १०० टक्के टॅरिफ

▪️अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांची घोषणा

✒️ सरकारकडून शेती कर्जवसुलीला स्थगिती

✒️ जमीन मोजणीचा निपटारा आता 30 दिवसांत !

▪️प्रकरणे मार्गी लागणार; खासगी भूमापकाची मोजणी सरकारी अधिकारी करणार

✒️ विधिमंडळातील आश्वासने ९० दिवसांत होणार पूर्ण

▪️विधानसभा उपाध्यक्ष अण्णा बनसोडे यांचा विश्वास

✒️ राहुल गांधींना नोबेल मिळण्यासाठी मोर्चेबांधणी

▪️काँग्रेसने केली मारिया मचाडो यांच्याशी तुलना

✒️ विरोधी पक्षाचे कामच टीका करणे !

▪️अजित पवारांचा उद्धव ठाकरेंना टोला

✒️ मनपा निवडणुकीत युती म्हणूनच लढणार

▪️मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे संकेत

✒️ गिलची शतकी चमक

▪️जडेजापुढे पाहुण्यांचे लोटांगण; भारताची सामन्यावर मजबूत पकड

✒️ सहाव्या गोलंदाजाचा पर्याय भारत स्वीकारणार?

▪️तगड्या ऑस्ट्रेलियाशी आज लढत; महिला विश्वचषक क्रिकेट स्पर्धा

✒️ स्व. आम. डॉ. गणपतराव देशमुख यांच्या घरावर बाटली फेक करून केलेल्या हल्ल्याच्या निषेधार्थ सर्वपक्षीय निषेध मोर्चा संपन्न

▪️न पुसणार काळा डाग सांगोला तालुक्याला लागला : कुणाच्या केसाला धक्का लागणार नाही याची जबाबदारी माझी: आम. डॉ. बाबासाहेब देशमुख

▪️तालुक्यातील शांततेला यापुढील काळात काळीमा लागणार नाही यासाठी आम्ही दोघेही प्रयत्न करणार : डॉ. अनिकेत देशमुख

✒️ यावर्षी मी माझा वाढदिवस साजरा करणार नाही: माजी आम. अॅड. शहाजी बापू पाटील

▪️वाढदिवसाच्या निमित्ताने अतिवृष्टीतील नुकसानग्रस्तांना सढळ हाताने मदत करण्याचे शहाजीबापू पाटील यांचे आवाहन

✒️ स्व. आमदार गणपतरावजी देशमुख यांच्या घरावर झालेल्या भ्याड हल्ल्याच्या निषेधार्थ सांगोला शहर व तालुक्यात कडकडीत बंद

✒️ सांगोल्याच्या इतिहासात १० ऑक्टोबर काळा दिवस – तालुकाध्यक्ष दत्ता सावंत

▪️राष्ट्रवादी शरद पवार पक्ष सांगोला तालुका यांच्या वतीने स्व. गणपतराव देशमुख यांच्या निवासस्थानावरील भ्याड हल्याचा निषेध

✒️ सांगोला पंचायत समिती सभापती पदासाठी सर्वसाधारण महिला आरक्षण

✒️ न्यायमूर्ती बी. आर. गवई यांच्यावर झालेल्या हल्ल्याचा सांगोला नागरीकांकडून तीव्र निषेध

सांगोला परिसर आणि राज्यातील बातम्या आणि माहिती सर्वात प्रथम मिळवण्यासाठी तुमच्या Whatsapp ग्रुपवर 78418 55301 हा आमचा नंबर समाविष्ट करा.
-
'सांगोला लाईव्ह'ला बातम्या व जाहिरात देण्यासाठी आजच संपर्क करा : 78418 55301
-
सोशल मीडियावर फॉलो करा -यूट्यूब, इन्स्टाग्राम आणि फेसबुक

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here