वाघमारे सरांच्या कराटे क्लासचे घवघवीत यश

0

कलर बेल्ट परीकक्षेत 37 मुलांचे यश 

सांगोला (प्रतिनिधी): दिनांक 12 ऑक्टोबर रोजी शोतोकान स्पोर्ट्स कराटे डेव्हलपमेंट असोसिएशन यांच्यामार्फत घेण्यात आलेल्या कलर बेल्ट परीक्षेमध्ये एकूण 37 मुलांनी यश संपादन केले. या परीक्षेला यलो बेल्ट गटात महादेव कोळेकर, तेजस्वी कदम, राजश्री कदम, अनुज बंडगर, परिणीता माने, आर्यन दरदरे, सिमरन शिनगारे, विराज कसबे, संकेत गोफणे, आयुष कसबे, यश गुरव, विघ्नेश ठोंबरे

तर ऑरेंज बेल्ट गटात श्रीश खारगे, शंभूराजे नाईक, आर्यन कांबळे, स्वरूप जगताप, विष्णू खांडेकर, वैष्णवी खांडेकर, युगंधरा फुले, विहान भोसले, अक्षरा लिगाडे, अनन्या लिगाडे, राजवीर सपाटे, तेजस्विनी खोत, ऋतुजा खोत, दुर्वांक खोत, सौ.सुवर्णा कोडग यांनी यश संपादन केले.

ग्रीन बेल्ट गटात प्रसन्न सूर्यगण, अनिरुद्ध जगताप, अजय गेडाम, सना तांबोळी, सोहन तांबोळी यांनी यश मिळविले.ब्राऊन बेल्ट गटात प्रणव लांडगे, शौर्य लांडगे, आयुष्मान मोरे, सोहम कदम, हर्ष चौगुले, शिप्रा चौगुले व गोल्डन ब्राऊन गटात सिद्धार्थ माने ब्लॅक बेल्ट गटात अविरत सरगर, अविनाश सरगर तर सीनियर ब्लॅक बेल्ट गटात आशिष कोकरे यांनी यश संपादन केले.

यशस्वी स्पर्धकांना विविध कलर बेल्ट प्रमाणपत्र देण्यात आले या परीक्षेला कता फाईट कुमिते टेक्निक व कता टेकनिक नवीन प्रकारच्या फाईट प्रकारच्या टेक्निक व किक्स जॉब पंच स्टमक फिटनेस आंतरराष्ट्रीय कीर्तीचे श्री सुनील वाघमारे सर, निजेंद्र चौधरी सर, श्रावणी वाघमारे मॅडम यांनी प्रशिक्षण दिले. या स्पर्धा परीक्षा यशस्वी करण्याकरता मयंक स्वामी, निजेंद्र चौधरी, राजनंदिनी वाघ आदींनी परिश्रम घेतले व यशस्वी स्पर्धकांना श्री सुनील वाघमारे सरांचे मार्गदर्शन लाभले.

सांगोला परिसर आणि राज्यातील बातम्या आणि माहिती सर्वात प्रथम मिळवण्यासाठी तुमच्या Whatsapp ग्रुपवर 78418 55301 हा आमचा नंबर समाविष्ट करा.
-
'सांगोला लाईव्ह'ला बातम्या व जाहिरात देण्यासाठी आजच संपर्क करा : 78418 55301
-
सोशल मीडियावर फॉलो करा -यूट्यूब, इन्स्टाग्राम आणि फेसबुक

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here