संगमनेरचे आमदार अमोल खताळ पाटील यांची काळे कुटुंबाच्या घरी सदिच्छा भेट 

0

सांगोला (प्रतिनिधी):  संगमनेर विधानसभा मतदारसंघाचे आमदार अमोल खताळ पाटील यांनी सांगोला शहरातील संजय काळे गुरुजी यांच्या घरी सहकुटुंब सदिच्छा भेट दिली. यावेळी काळे परिवाराकडून अमोल खताळ पाटील यांचा यथोचित सन्मान करण्यात आला. यावेळी सांगोला शहरातील अनेक मान्यवर उपस्थित होते.

अमोल खताळ पाटील यांनी संकेत काळे यांनी विविध स्पर्धांमध्ये मिळवलेल्या यशाबद्दल अभिनंदन केले आणि पुढील कारकिर्दीसाठी शुभेच्छा दिल्या. काळे कुटुंबाच्या भेटीनंतर खताळ पाटील यांनी पंढरपूरकडे पांडुरंगाच्या दर्शनासाठी प्रयाण केले.

यावेळी शिक्षक नेते भिवाजी कांबळे गुरुजी, संभाजी ब्रिगेडचे जिल्हाध्यक्ष अरविंद केदार,शिवसेना वैद्यकीय मदत कक्षाचे जिल्हाप्रमुख अमित पाटील, तालुकाप्रमुख सुरज काळे, सेवानिवृत्त शिक्षक संघटनेचे अरुण वाघमोडे, सत्यम जोशी, गंगाधर इमडे, प्रा. तानाजी खंडागळे, नागेश भोसले सर, शहाजी काळे, सेवानिवृत्त केंद्रप्रमुख पांडुरंग खंडागळे, प्रविण काळे, बॉडीबिल्डर संकेत काळे, अॅडव्होकेट सोमनाथ काळे, औदुंबर काळे, कोठावळे गुरुजी, डिगोळे गुरुजी, संतोष कांबळे गुरुजी, शेंबडे सर, विनोद जाधव गुरुजी, अतुल गवळी आदी मान्यवर उपस्थित होते. त्याचबरोबर मित्र नगर मधील सर्व सन्माननीय शिक्षक बंधू आणि भगिनी बहुसंख्येने उपस्थित होते.

सांगोला परिसर आणि राज्यातील बातम्या आणि माहिती सर्वात प्रथम मिळवण्यासाठी तुमच्या Whatsapp ग्रुपवर 78418 55301 हा आमचा नंबर समाविष्ट करा.
-
'सांगोला लाईव्ह'ला बातम्या व जाहिरात देण्यासाठी आजच संपर्क करा : 78418 55301
-
सोशल मीडियावर फॉलो करा -यूट्यूब, इन्स्टाग्राम आणि फेसबुक

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here