सांगोला (प्रतिनिधी): चला धावूया! निरोगी राहूया!! हे ब्रीद घेऊन सुरू झालेले ही ग्रामीण भागातील मॅरेथॉन स्पर्धा 11 जानेवारी 2026 रोजी सकाळी सहा वाजता कडलास ता.सांगोला येथील कै. रावसाहेब पाटील आदर्श विद्यालय कडलाच्या मैदानावर होत आहे.

कडलास गावचे सुपुत्र श्री सचिन कुंडलिक पवार साहेब कार्यकारी अभियंता ,जलसंपदा विभाग ,सोलापूर यांच्या प्रेरणेने व संकल्पनेतून ही स्पर्धा होत आहे. या स्पर्धेत सहभागी होण्यामागील उद्देश फक्त धावणे नाही तर आरोग्य, शिस्त, आत्मविश्वास आणि क्रीडा संस्कृती रुजवणे हा आहे.
स्पर्धेचे गट व बक्षीसे पुढील प्रमाणे: स्पर्धेसाठी पुरुष व स्त्री तसेच मुले व मुली असे स्वतंत्र गट आहेत. खुला गट क्र.1: 10किमी धावणे .प्रथम पाच हजार रुपये, द्वितीय तीन हजार रुपये ,तृतीय 2000 रुपये.

शालेय मुलांसाठी गट क्रमांक 2: 5किमी धावणे आठवी ते दहावी साठी .प्रथम एक हजार रुपये द्वितीय सातशे रुपये तृतीय पाचशे रुपये
गट क्रमांक 3:3 किमी धावणे. पाचवी ते सातवी .प्रथम क्रमांक एक हजार रुपये द्वितीय क्रमांक सातशे रुपये तृतीय क्रमांक पाचशे रुपये.
वरील स्पर्धा ही नववर्षाचे स्वागत आरोग्यदायी चळवळीने करण्यासाठी आयोजित केली आहे. स्पर्धेसाठी प्रवेश फी नाही. खुल्या गटातील खेळाडूंनी आधार कार्ड आणावे. तसेच शालेय गटातील खेळाडूंनी आधार कार्ड व शाळेचे बोनाफाईट सोबत आणावे. स्पर्धेत ऐनवेळी भाग घेता येईल, असे संयोजकांच्या वतीने कळविण्यात आले आहे.

सांगोला परिसर आणि राज्यातील बातम्या आणि माहिती सर्वात प्रथम मिळवण्यासाठी तुमच्या Whatsapp ग्रुपवर 78418 55301 हा आमचा नंबर समाविष्ट करा.
-
'सांगोला लाईव्ह'ला बातम्या व जाहिरात देण्यासाठी आजच संपर्क करा : 78418 55301
-
सोशल मीडियावर फॉलो करा -यूट्यूब, इन्स्टाग्राम आणि फेसबुक



