सांगोला (प्रतिनिधी): खंडोबा बहुउद्देशीय संस्था, येलमार मंगेवाडी संचलित पायोनियर पब्लिक स्कूल मध्ये विद्यार्थ्यांच्या कलागुणांना वाव देण्यासाठी सोलो डान्स स्पर्धेचे आयोजन करण्यात आले. या स्पर्धेचे उद्घाटन संस्थेच्या सचिवा सौ. मनीषा अनिल येलपले मॅडम यांच्या शुभहस्ते नटराजाची पूजा करून करण्यात आले.

या वेळी शाळेचे प्रिन्सिपल श्री. सतीश देवमारे सर, अकॅडेमीक इनचार्ज मृणाल राऊत मॅडम तसेच स्पर्धा विभागाच्या प्रमुख सौ. प्रतीक्षा येलपले मॅडम उपस्थित होत्या.
या स्पर्धेमध्ये शाळेतील प्री-प्रायमरी ते इयत्ता सहावीपर्यंतच्या सुमारे ४० विद्यार्थ्यांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदवला. विद्यार्थ्यांनी लावणी, लोकनृत्य, वेस्टर्न डान्स अशा विविध नृत्यप्रकारांचे सादरीकरण करून उपस्थितांची मने जिंकली.

विद्यार्थ्यांमध्ये स्टेज डेरिंग, आत्मविश्वास व व्यक्तिमत्त्व विकास घडावा या उद्देशाने ही स्पर्धा आयोजित करण्यात आली होती.
या स्पर्धेसाठी प्री-प्रायमरी विभागासाठी सौ. रुपाली गायकवाड मॅडम व प्रायमरी विभागासाठी मृणाल राऊत मॅडम यांनी परीक्षक म्हणून काम पाहिले. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन कु. प्रियांका मोहिते मॅडम यांनी अत्यंत प्रभावीपणे केले.शाळेमध्ये अशा प्रकारच्या विविध स्पर्धांचे आयोजन वेळोवेळी करण्यात येते. विद्यार्थ्यांमधील सुप्त गुण ओळखून ते विकसित करण्यासाठी शाळा नेहमीच तत्पर असते.कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनाबद्दल शाळा व्यवस्थापन व शिक्षकवर्गाचे सर्वत्र कौतुक करण्यात आले.

सांगोला परिसर आणि राज्यातील बातम्या आणि माहिती सर्वात प्रथम मिळवण्यासाठी तुमच्या Whatsapp ग्रुपवर 78418 55301 हा आमचा नंबर समाविष्ट करा.
-
'सांगोला लाईव्ह'ला बातम्या व जाहिरात देण्यासाठी आजच संपर्क करा : 78418 55301
-
सोशल मीडियावर फॉलो करा -यूट्यूब, इन्स्टाग्राम आणि फेसबुक



