जिल्हा परिषद प्राथमिक शाळा सावे येथे शाळा प्रवेशोत्सव मोठ्या उत्साहात साजरा

0

सावे (प्रतिनिधी): शाळा प्रवेशोत्सवासाठी शाळेच्या प्रवेशद्वाराजवळील सुंदर रांगोळी काढण्यात आली. तसेच इयत्ता पहिली मध्ये नवीन दाखल पात्र विद्यार्थ्यांची मिरवणूक काढण्यासाठी ट्रॅक्टरची व्यवस्था करण्यात आली. ट्रॅक्टरला सुंदर सजावट करण्यात आली.

इयत्ता पहिली मध्ये दाखल चिमुकल्यांची ट्रॅक्टर मधून संपूर्ण गावभर भव्य मिरवणूक काढण्यात आली. चिमुकल्याचे शाळेतील पहिले पाऊल खूप महत्त्वाचे असते. इयत्ता पहिलीच्या वर्ग शिक्षिका आदलिंगे मॅडम यांच्या कल्पनेतून नवीन दाखल मुलांच्या पाऊलांचे ठसे घेतले.शाळेच्या प्रांगणामध्ये नवीन दाखल विद्यार्थ्यांच्या स्वागताचा कार्यक्रम घेण्यात आला कार्यक्रमासाठी उपस्थित सावे गावाचे सरपंच माननीय शिवाजी वाघमोडे, शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष मा शंभू माने सावे विकास सोसायटीचे चेअरमन किसन शेळके ,शाळा व्यवस्थापन समिती सदस्य ज्ञानेश्वर इमडे, शाळा व्यवस्थापन समिती माजी अध्यक्ष माळाप्पा गावडे, शाळा व्यवस्थापन समितीची सदस्य अशोक सुतार ,अण्णा माने ,

संजय सरगर सर अजित देवकते सर संजय गडदे प्रविण पगारे अंकुश माने , शाळेचे मुख्याध्यापिका वनिता शिंदे मॅडम,रवींद्र जवंजाळ सर, संजय काळे सर, दिलावर तांबोळी सर, चंद्रकांत भोजने सर, जयश्री रुपनर मॅडम, उर्मिला आदलिंगे मॅडम, तानाजी घाडगे सर व विद्यार्थी उपस्थित होते. सर्वप्रथम इयत्ता पहिलीत दाखल विद्यार्थ्यांचे गुलाब पुष्प देऊन स्वागत करण्यात आले. त्यानंतर शाळेतील सर्वच विद्यार्थ्यांना मोफत पाठ्यपुस्तकाचे वाटप करण्यात आले

कार्यक्रमांमध्ये सर्व विद्यार्थ्यांना मोफत गणवेशाचे वाटप करण्यात आले. शाळेतील प्रत्येक वर्गाच्या शिक्षकानी वर्षभरात आपल्या वर्गातील विद्यार्थ्यांसाठी करावयाच्या विशेष उपक्रमाची माहिती दिली.अध्यक्ष मनोगत मध्ये शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष शंभू माने आपल्या शाळेमध्ये पहिलीपासून यावर्षी सीबीसी पॅटर्न सुरू करावा , विद्यार्थ्यांची गुणवत्ता वाढावी ‌ व चालू शैक्षणिक वर्षात आपल्या अभ्यासक्रमाचे नियोजनाची माहिती द्यावी अशी विनंती त्यांनी शिक्षकांना केली यांनी पालकांच्या विद्यार्थ्यांसाठी असलेल्या अपेक्षा व्यक्त केल्या व त्या अपेक्षा पूर्ण करण्यासाठी शिक्षकांना सहकार्य करण्याचे आश्वासन दिले.मागील वर्षाच्या शिक्षकांच्या कामकाजावरती अध्यक्षांनी समाधान व्यक्त केले.

व सर्व शिक्षक व विद्यार्थ्यांना त्यांनी चालू शैक्षणिक वर्षासाठी शुभेच्छा दिल्या.कार्यक्रमाचे सूत्रसंचालन संजय काळे सर यांनी केले व कार्यक्रमाचे आभार प्रदर्शन चंद्रकांत भोजने सर यांनी केले.यावेळी कार्यक्रमासाठी मोहसीन आतार, राहुल बंडगर , सतीश मिटकरी, सुभाष माने, बाळासाहेब नलावडे, दीपक ऐवळे, अरुण माने , शंभू शेजाळ, सोमनाथ बंडगर, इत्यादी ग्रामस्थ उपस्थित होते.

सांगोला परिसर आणि राज्यातील बातम्या आणि माहिती सर्वात प्रथम मिळवण्यासाठी तुमच्या Whatsapp ग्रुपवर 78418 55301 हा आमचा नंबर समाविष्ट करा.
-
'सांगोला लाईव्ह'ला बातम्या व जाहिरात देण्यासाठी आजच संपर्क करा : 78418 55301
-
सोशल मीडियावर फॉलो करा -यूट्यूब, इन्स्टाग्राम आणि फेसबुक

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here