गुरूंचे आशीर्वाद, योग्य मार्गदर्शन आणि सकारात्मक विचारामुळे विद्यार्थ्यांना यश मिळते :– म.ज.घोंगडे सर

0

वामनराव शिंदे साहेब आदर्श विद्यालयात गुरुपौर्णिमा उत्साहात साजरी 

सांगोला ( प्रतिनिधी): आदर्श शिक्षण प्रसारक मंडळ संचलित वामनराव शिंदे साहेब आदर्श विद्यालयात गुरुपौर्णिमा उत्साहात साजरी करण्यात आली.प्रशालेत सुरुवातीस संस्थापक वामनराव शिंदे साहेब व सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेचे पूजन संस्थाध्यक्षा श्रीमती कौशल्यादेवी शिंदे मॅडम , प्रमुख पाहुणे म .ज .घोंगडे सर, मुख्याध्यापक विठ्ठलपंत शिंदे सर, सचिव निलकंठ शिंदे सर या प्रमुख मान्यवरांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करून करण्यात आले.

यावेळी कार्यक्रमाची सुरुवात विद्यार्थीनिनी गुरु प्रार्थनेने स्वागत करून केली .प्रशालेतील ऋतुजा उबाळे, सोफिया पठाण, ईश्वर चव्हाण, रोहन निंबाळकर, नेहा ठोकळे, जितू निंबाळकर या विद्यार्थ्यांनी गुरुपौर्णिमेनिमित्त शिक्षकांप्रती कृतज्ञता व्यक्त केली. यावेळी

प्रमुख पाहुणे माणदेशी साहित्यिक, कथा कथनकार म ज घोंगडे सर विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना गुरु व शिष्यांच्या नात्याबद्दल असणारे महत्व सांगितले. विद्यार्थ्यांना धाडस, आत्मविश्वास , विवेक व शिस्त निर्माण करण्याचे कार्य गुरुजन वर्गाद्वारे होत असल्याचे प्रतिपादन केले. गुरूंचे आशीर्वाद, योग्य मार्गदर्शन आणि सकारात्मक विचारामुळे विद्यार्थ्यांना यश मिळत असल्याचे सांगितले.

अंधारातून प्रकाशाकडे नेण्याचा मार्ग देखील गुरु दाखवत असल्याचे गौरवोउद्गार काढले. आपल्या जीवनात प्रथम माता पिता नंतर शिक्षकांना गुरु मानून विद्यार्थ्यांनी गुणवत्तेत अग्रस्थानी राहण्याचे मार्गदर्शन केले. घोंगडे सरांनी अनेक कथा व यशस्वी जीवनाचा मूलमंत्र विद्यार्थ्यांना दिला गुरुपौर्णिमेनिमित्त प्रशालेतील सर्व शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी यांचा गुलाब पुष्प, श्रीफळ देऊन संस्थाध्यक्षा श्रीमती कौशल्यादेवी शिंदे मॅडम यांनी सत्कार करून शुभेच्छा दिल्या.

कार्यक्रमाचे प्रास्ताविक अर्चना गोडसे मॅडम व सूत्रसंचालन ताई भालके मॅडम यांनी केले. आभार प्रदर्शन विठ्ठलपंत शिंदे सर यांनी केले कार्यक्रम यशस्वीतेसाठी प्रशालेतील सर्व शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी यांनी परिश्रम घेतले. आभार प्रदर्शन सुयोग बनसोडे सर यांनी मानले.

सांगोला परिसर आणि राज्यातील बातम्या आणि माहिती सर्वात प्रथम मिळवण्यासाठी तुमच्या Whatsapp ग्रुपवर 78418 55301 हा आमचा नंबर समाविष्ट करा.
-
'सांगोला लाईव्ह'ला बातम्या व जाहिरात देण्यासाठी आजच संपर्क करा : 78418 55301
-
सोशल मीडियावर फॉलो करा -यूट्यूब, इन्स्टाग्राम आणि फेसबुक

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here