ठळक बातम्या – 13/11/2026

0

✒️ माझा भाऊ गेला तेव्हाच माझ्यासाठी तो विषय संपला

▪️सुप्रिया सुळेंचं विलिनीकरणावर स्पष्ट मत

✒️ मंत्री संजय शिरसाट यांच्या घरावर हल्ल्याचा प्रयत्न

▪️मद्यधुंद तरुणांनी फेकल्या बाटल्या

✒️ महागाईचा भडका !

▪️महागाई दर ऑक्टोबरमध्ये ८.९४ टक्क्यांवर

▪️रिझर्व्ह बँकेच्या अंदाजापल्याड अन्नधान्याच्या दरांची झेप

▪️पुढील महिन्यात व्याजदरात वाढ होण्याचा अर्थतज्ज्ञांचा अंदाज

▪️डिसेंबरमध्ये रेपो दरवाढीचे संकेत

✒️ सोने आणि चांदीच्या दरात मोठी घसरण

▪️चांदी 3901 रुपयांनी स्वस्त

✒️ परिसीमन, महिला आरक्षण विधेयकासाठी संसदेचे विशेष अधिवेशन लवकरच

▪️सर्वपक्षीय बैठकीची मागणी

✒️ छेडछाडीला विरोध केल्याने तरुणीला लोकलमधून ढकलले

▪️तरुणीने डावा हात गमावला : ५३ वर्षीय आरोपीला अटक

✒️ अमूलच्या दुधाच्या दरात वाढ, आजपासून नवे दर लागू

✒️ आंदोलकावरील गुन्हा रद्द

▪️हायकोर्टाचा निर्णय, फौजदारी कारवाईचा वापर दुर्दैवी !

✒️ अमरावतीत मायक्रो फायनान्सच्या जाचाला कंटाळून शेतकऱ्यानं स्वतःला विहिरीत झोकून दिलं

▪️पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्याकडून गंभीर दखल

✒️ सीसीटीव्हीतून चीनची ‘हेरगिरी’

▪️सुरक्षा कॅमेऱ्यांमधूनच देशाच्या सुरक्षेला धोका

▪️गुप्तचर यंत्रणांकडून सतर्कतेचा इशारा

✒️ तहसील कार्यालयात अस्वच्छता

▪️ मंत्री गिरीश महाजनांच्या हाती झाडू; दारुच्या रिकाम्या बाटल्या पाहून संताप

✒️ एनवीडियाचे सीईओ जेनसेन हुआंग यांचा राजीनामा

▪️चिनी महिलेसोबतचं प्रेमप्रकरण भोवलं

✒️ विलीनीकरणाबाबत संभ्रम कायम

▪️दोन्ही राष्ट्रवादींचा एकत्रीकरणाचा कोणताही प्रस्ताव नाही – सुप्रिया सुळे

✒️ जम्मू-काश्मीरमध्ये २ एसपीओंची हत्या

✒️ रिजन्सी ग्रुपचे सीएमडी महेश अग्रवाल यांचेकडून दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांच्या मदतीसाठी ५० लाखांची मदत

▪️मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मानले आभार

✒️ केजरीवाल आणि त्यांच्या कन्येला धमकी

▪️सात कोटी रुपये खंडणीचीही केली मागणी

✒️ सह्याद्रीतील वृक्षतोडीविरोधात ‘टायगर ग्रुप’ आक्रमक

▪️कामे थांबविण्यासाठी जनआंदोलनाचा इशारा

✒️ आयडीबीआय बँकेचा भविष्यातील प्रवास स्पष्ट

▪️विमा-बँकिंग एकत्र ?

▪️युनिव्हर्सल बैंक बनण्याची क्षमता असल्याचे फेअरफॅक्स सीओओंचे प्रतिपादन

✒️ रशियाकडून भारताची विक्रमी तेल खरेदी

✒️ शेअर बाजारात तिसऱ्या दिवशीही तेजी

▪️सेन्सेक्स ८१,९०० पार

▪️निफ्टी ४४.३० अंक वर

✒️ मालिका विजयाची आज संधी

▪️श्रेयसच्या नेतृत्वात भारताचा न्यूझीलंडविरुद्ध चौथा एकदिवसीय सामना

✒️ भारतीय युवा संघाची अंतिम फेरीत धडक

▪️लक्ष्य, सेहवाग यांच्या अर्धशतकांमुळे अफगाणिस्तानवर वर्चस्व

▪️फायनल पाकिस्तान सोबत

✒️ सोनंद गावच्या ग्रामस्थाचे भर उन्हात रस्ता रोको आंदोलन

▪️महामार्गावरील पुलाचे काम सुरु करण्याची मागणी

▪️ राष्ट्रीय महामार्ग विभागाकडून लेखी आश्वासन दिल्यानंतर आंदोलन मागे

सांगोला परिसर आणि राज्यातील बातम्या आणि माहिती सर्वात प्रथम मिळवण्यासाठी तुमच्या Whatsapp ग्रुपवर 78418 55301 हा आमचा नंबर समाविष्ट करा.
-
'सांगोला लाईव्ह'ला बातम्या व जाहिरात देण्यासाठी आजच संपर्क करा : 78418 55301
-
सोशल मीडियावर फॉलो करा -यूट्यूब, इन्स्टाग्राम आणि फेसबुक

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here