सांगोला (प्रतिनिधी): सांगोल्यातील शहीद अशोक कामटे बहुउद्देशीय सामाजिक संघटनेच्यावतीने मध्य रेल्वेचे महाव्यवस्थापक मुंबई यांना रेल्वेच्या विविध मागण्याचे निवेदन देण्यात आले.

प्रामुख्याने नागपूर– गोवा वास्को-दि-गामा एक्सप्रेस रेल्वे लातूर, धाराशिव, बार्शी, कुर्डुवाडी, पंढरपूर, सांगोला,मिरज, बेळगाव, लोंढा,मडगाव मार्गे सुरू करण्यात यावी, सांगोला –शेगाव एक्सप्रेस (गजानन महाराज मंदिर) रेल्वे, सकाळी सत्रात कोल्हापूर– सोलापूर –कलबुर्गी रेल्वे गाड्या सुरू करण्यात याव्यात . तसेच 11027 & 11028 दादर– सातारा– दादर रेल्वे दररोज सोडावी, सांगोला रेल्वे स्टेशनवर कोच इंडिकेटरची सुविधा करावी. अशी आग्रही मागणी अशोक कामटे संघटनेने सर्व खासदार महोदय व रेल्वे बोर्डाकडे केली आहे.

रेल्वे बोर्डाची उद्या पुणे येथे 19 ऑगस्ट रोजी सर्व खासदारांसमवेत बैठकीचे आयोजन करण्यात आले आहे यामध्ये प्रामुख्याने या मागण्यांचा गंभीर्याने विचार करून मागण्या मंजूर करण्यात याव्यात अशी मागणी शहीद अशोक कामटे बहुउद्देशीय सामाजिक संघटनेने निवेदनाद्वारे केली आहे.
विभागीय रेल्वेच्या बैठकीत सर्वच खासदारांनी आपापल्या भागातील प्रलंबित रेल्वे गाड्या सुरू करणे, थांबे देणे व भौतिक सुविधा निर्माण करणे या समस्येप्रश्नी खासदारांनी रेल्वे बोर्डाकडे पाठपुरावा सातत्याने करणे आवश्यक आहे, उद्याच्या बैठकीत प्रलंबित मागण्यांवर कायमस्वरूपी तोडगा काढावा अशी प्रवाशांची मागणी जोर धरत आहे.
निलकंठ शिंदे सर,
अध्यक्ष:–अशोक कामटे बहुउद्देशीय सामाजिक संघटना सांगोला.

सांगोला परिसर आणि राज्यातील बातम्या आणि माहिती सर्वात प्रथम मिळवण्यासाठी तुमच्या Whatsapp ग्रुपवर 78418 55301 हा आमचा नंबर समाविष्ट करा.
-
'सांगोला लाईव्ह'ला बातम्या व जाहिरात देण्यासाठी आजच संपर्क करा : 78418 55301
-
सोशल मीडियावर फॉलो करा -यूट्यूब, इन्स्टाग्राम आणि फेसबुक



