नराळे येथे जिव्हाळा बालगृहचा शुभारंभ

0

नराळे : सांगोला तालुक्यातील नराळे येथे दुर्गामाता बहुउद्देशीय संस्था संचलित जिव्हाळा बालगृह’चा उद्घाटन समारंभशनिवार, दि.१५ ऑगस्ट २०२६ रोजी सकाळी ९ वाजता उत्साहात पार पडला.

यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून सरपंच वैशाली पांडुरंग भोसले, पोलीस पाटील नरेंद्र पाटील, सामाजिक कार्यकर्ते ज्ञानेश्वर भोसले, अशोक माने, शिक्षण समितीचे अध्यक्ष अण्णासाहेब कुलाळ, उपस्थित होते.यावेळी सरपंच सेवा संघ महाराष्ट्र राज्य आदर्श सरपंच म्हणून सरपंच वैशाली भोसले यांना पुरस्कार जाहीर झाल्यामुळे जिव्हाळा बालगृहचे संस्थापक अध्यक्ष विकास गुंडाप्पा मोरे यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.

अनाथांची सेवा हीच खरी सेवा’ या भावनेतून सुरू करण्यात आलेले हे बालगृह अनाथ, वंचित, निराधार, ऊसतोड मजूर, वीटभट्टी कामगार,भटक्या-विमुक्त तसेच गरीब व गरजू कुटुंबातील मुलांसाठी आधार ठरणार आहे. मुलांना निवारा, शिक्षण, संगोपन आणि सुरक्षित वातावरण उपलब्ध करून देण्याचा संस्थेचा मानस असल्याचे संयोजकानी सांगितले.

विना अनुदानित तत्त्वावरील शासन मान्यता प्राप्त दुर्गामाता बहुउद्देशीय संस्था संचलित या जिव्हाळा बालगृहाची सुरुवात जत सांगोला रोड, डिस्कळ फाटा, नराळे, ता. सांगोला येथे करण्यात आली आहे. बालगृहाच्या माध्यमातून गरजू मुलांना शिक्षणाची संधी मिळण्याबरोबरच त्यांच्या सर्वांगीण विकासासाठी आवश्यक सुविधा उपलब्ध करून देण्याचा प्रयत्न केला जाणार असल्याचे संस्थेच्या वतीने सांगण्यात आले. यावेळी पांडुरंग भोसले, मधुकर भोसले, जायाप्पा जाधव, गणेश भोसले, शेलार भिसे, जालिंदर भोसले, संजय मोरे, कृष्णा मोरे, एकनाथ निकम यांच्यासह ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.

सांगोला परिसर आणि राज्यातील बातम्या आणि माहिती सर्वात प्रथम मिळवण्यासाठी तुमच्या Whatsapp ग्रुपवर 78418 55301 हा आमचा नंबर समाविष्ट करा.
-
'सांगोला लाईव्ह'ला बातम्या व जाहिरात देण्यासाठी आजच संपर्क करा : 78418 55301
-
सोशल मीडियावर फॉलो करा -यूट्यूब, इन्स्टाग्राम आणि फेसबुक

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here