सांगोला (प्रतिनिधी): ‘ऋतु बरवा*’ या विशेष सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन शनिवार दि. ५ सप्टेंबर रोजी करण्यात आले आहे. संध्याकाळी ७ वाजता पुण्यश्लोक राजमाता अहिल्यादेवी होळकर सभागृह, सांगोला येथे हा कार्यक्रम रंगणार आहे.

या कार्यक्रमात सुप्रसिद्ध कलाकार वैभव जोशी आणि अमर ओक यांच्या कलाविष्काराचा आनंद रसिकांना घेता येणार आहे. अभिनय, काव्य, संगीत आणि कलात्मक सादरीकरणाचा सुरेख संगम या कार्यक्रमातून अनुभवता येणार असून सांगोल्यातील रसिकांसाठी हा एक आगळावेगळा सांस्कृतिक मेजवानीचा अनुभव ठरणार आहे.संगीतप्रेमींसाठी ही मैफल विशेष आकर्षण ठरणार असून, सुरेल शब्दांची लयबद्ध अनुभूती आणि भावस्पर्शी सादरीकरणाचा आनंद रसिकांना घेता येणार आहे.

कार्यक्रमासाठी तिकिटांचे दर ₹१०००, ₹७०० आणि ₹५०० असे ठेवण्यात आले आहेत. तिकीट बुकिंग व अधिक माहितीसाठी श्री. संगमेश्वर (राहुल) घोंगडे सर – ९७६७००३७८९ यांच्याशी संपर्क साधावा. तिकीट बुकिंगसाठी दिलेल्या व्हॉट्सॲप क्रमांकावर संदेश पाठवावा, असे आयोजकांकडून सांगण्यात आले आहे.

सांगोला व परिसरातील कला आणि सांस्कृतिक रसिकांनी या अनोख्या कार्यक्रमाचा लाभ घ्यावा, असे आवाहन आयोजकांच्या वतीने करण्यात आले आहे.

सांगोला परिसर आणि राज्यातील बातम्या आणि माहिती सर्वात प्रथम मिळवण्यासाठी तुमच्या Whatsapp ग्रुपवर 78418 55301 हा आमचा नंबर समाविष्ट करा.
-
'सांगोला लाईव्ह'ला बातम्या व जाहिरात देण्यासाठी आजच संपर्क करा : 78418 55301
-
सोशल मीडियावर फॉलो करा -यूट्यूब, इन्स्टाग्राम आणि फेसबुक



