सांगोला नगरपालिकेच्या पाणीपुरवठा विभागात पाणीपुरवठा अभियंत्याच्या मनमानी व भ्रष्ट कारभाराची शासनाने समिती नेमून चौकशी करण्याची मागणी 

0

शहराचा पाणीपुरवठा विस्कळीत    

सांगोला (प्रतिनिधी): सांगोला नगरपालिकेच्या पाणीपुरवठा विभागामध्ये पदभार घेतलेले पाणीपुरवठा अभियंता यांनी मनमानी कारभार व प्रचंड प्रमाणात भ्रष्टाचार सुरू केला आहे पाणीपुरवठा विभाग पूर्णपणे विस्कळीत झाला असून नागरिक आंदोलनाच्या पावित्र्यात आहेत या पाणीपुरवठा विभागाच्या अभियंत्याने केलेल्या भ्रष्टाचाराची शासनाने समिती नेमून चौकशी करावी व या अभियंत्यावर गुन्हा दाखल करावा अशी मागणी सांगोला नगरपालिकेचे मा. नगरसेवक सतीश भाऊ सावंत यांनी नगर विकास मंत्री जिल्हाधिकारी यांच्याकडे लेखी निवेदनाद्वारे केली आहे.

सांगोला नगरपालिकेमध्ये पाणीपुरवठा अभियंता म्हणून ऑक्टोंबर 2024 मध्ये करण सरोदे यांनी पदभार घेतला आहे करण सरोदे यांनी पदभार घेतल्यापासून मनमानी कारभार व भ्रष्टाचार सुरू केला आहे हम करे सो कायद्याप्रमाणे कामकाज सुरू असून माझ कोणी काही करू शकत नाही अशा आविर्भावात ते वागत आहेत मनमानी कारभारामुळे सांगोला शहराचा पाणीपुरवठा विस्कळीत झाला आहे नागरिकांना पाणी वेळेवर मिळत नाही कमी दाबाने पाणीपुरवठा होतो सणासुदीच्या दिवसांमध्ये नागरिक त्रस्त झालेले आहेत.

आधीच दुष्काळी तालुका असलेल्या सांगोला शहरात या पाणीपुरवठ्या अभियंत्याने कोणत्याच पदाधिकाऱ्याला विश्वासात न घेता कामकाज सुरू केले आहे साहित्य खरेदी केल्याची बोगस बिले तयार करून हा अभियंता भ्रष्टाचार करीत आहे या अभियंत्याने प्रशासकाच्या काळात ज्या पद्धतीने कामकाज केले आहे त्या पद्धतीने आता पदाधिकारी आहेत याचे भान न ठेवता हा अभियंता कामकाज करीत आहे सांगोला नगरपालिकेमध्ये पदाधिकारी अजिबात लक्ष देत नसल्यामुळे हा पाणीपुरवठा अभियंता मनमानी कारभार करीत आहे या अभियंत्याने आतापर्यंत केलेल्या भ्रष्टाचाराची शासनाने समिती नेमून चौकशी करावी व या अभियंत्यावर तात्काळ गुन्हा दाखल करावा अशी मागणी सांगोला नगरपालिकेची मा. नगरसेवक सतीश भाऊ सावंत यांनी राज्याचे नगर विकास मंत्री व जिल्हाधिकारी यांच्याकडे लेखी निवेदनाद्वारे केली आहे.

सांगोला परिसर आणि राज्यातील बातम्या आणि माहिती सर्वात प्रथम मिळवण्यासाठी तुमच्या Whatsapp ग्रुपवर 78418 55301 हा आमचा नंबर समाविष्ट करा.
-
'सांगोला लाईव्ह'ला बातम्या व जाहिरात देण्यासाठी आजच संपर्क करा : 78418 55301
-
सोशल मीडियावर फॉलो करा -यूट्यूब, इन्स्टाग्राम आणि फेसबुक

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here