आमदार डॉ. बाबासाहेब देशमुख यांच्या हस्ते स्पर्धेचे उद्घाटन
सांगोला (प्रतिनिधी) : महाराष्ट्र शासनाच्या क्रीडा व युवा सेवा संचालनालय, महाराष्ट्र राज्य, पुणे अंतर्गत जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय व जिल्हा क्रीडा परिषद, सोलापूर यांच्या संयुक्त विद्यमाने आणि स्पोर्ट्स कराटे असोसिएशन, सोलापूर यांच्या सहकार्याने आयोजित जिल्हास्तरीय शालेय कराटे क्रीडा स्पर्धा सन २०२६-२७ चे उद्घाटन आमदार डॉ. बाबासाहेब देशमुख यांच्या हस्ते थाटात पार पडले.

यावेळी जिल्हा क्रीडा अधिकारी राहुल गायकवाड, तालुका संयोजक काशिलिंग शेळके सर, कराटे असोसिएशनचे जिल्हाध्यक्ष जी. के. वाघमारे सर आणि ज्येष्ठ कराटे प्रशिक्षक सुनील वाघमारे सर यांची प्रमुख उपस्थिती होती.

राष्ट्रीय पंचांच्या मार्गदर्शनाखाली या स्पर्धा आयोजित करण्यात आल्या आहेत. स्पर्धेच्या आयोजनासाठी निजेंद्र चौधरी, गणेश पवार, श्रावणी वाघमारे आणि सुनील वाघमारे यांनी विशेष योगदान दिले.

स्पर्धा यशस्वी करण्यासाठी क्रांतीश्वर बनकर, राहुल दोंदे, मयंक स्वामी, अजय वाघेला, लखन भगत आदींनी परिश्रम घेतले. कार्यक्रमाच्या शेवटी कराटे असोसिएशनचे जिल्हाध्यक्ष जी. के. वाघमारे यांनी उपस्थित मान्यवरांचे आभार मानले.
या स्पर्धेमुळे शालेय विद्यार्थ्यांना आपले कराटे कौशल्य दाखविण्याची आणि क्रीडा क्षेत्रात प्रगती करण्याची संधी उपलब्ध झाली आहे.

सांगोला परिसर आणि राज्यातील बातम्या आणि माहिती सर्वात प्रथम मिळवण्यासाठी तुमच्या Whatsapp ग्रुपवर 78418 55301 हा आमचा नंबर समाविष्ट करा.
-
'सांगोला लाईव्ह'ला बातम्या व जाहिरात देण्यासाठी आजच संपर्क करा : 78418 55301
-
सोशल मीडियावर फॉलो करा -यूट्यूब, इन्स्टाग्राम आणि फेसबुक



