ठळक बातम्या – 26/10/2026

0

✒️ भाजपमध्ये जाण्यापेक्षा जेलमध्ये जाऊन हिरो बना

▪️प्रणिती शिंदेंचा भाजपवर हल्लाबोल

✒️ प्रकल्प पर्यावरणपूरकच

▪️टोरंटबाबत मुख्यमंत्र्यांचे सडेतोड उत्तर

▪️विरोधकांकडून केवळ ‘फेक नरेटिव्ह’

✒️ गणेश नाईक म्हणाले राज्यात मोठी उलथापालथ होईल

▪️गुलाबराव पाटील म्हणाले, उलथापालथ व्हायला भूकंप आहे काय, मी भाकिताला मानत नाही

✒️ 4500 पहिली उचल जाहीर केल्याशिवाय कारखाने सुरू करू देणार नाही..’

▪️स्वाभिमानीची राजू शेट्टींच्या नेतृत्वात कोल्हापूर जिल्ह्यात विराट मोटरसायकल रॅली

✒️ ‘नैना’त १५ लाख रोजगार निर्मिती

▪️भूमिपुत्रांना प्राधान्य; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची ग्वाही

✒️ ‘एसआयआर’ साठी वापरलेल्या सॉफ्टवेअरची माहिती देणे अशक्य

▪️ट्रेड सिक्रेट असल्याचे निवडणूक आयोगाचे स्पष्टीकरण

✒️ चलो दिल्ली, आमची मतं चोरताहेत, आम्ही मुकाट्याने सहन करणार नाही..’

▪️राहुल गांधींनी रामलीला मैदानातील रॅलीचा हुंकार भरला

✒️ राष्ट्रवादीला अर्थखाते ?

▪️फडणवीस यांचा सकारात्मक प्रतिसाद

▪️हिवाळी अधिवेशनापूर्वी निर्णय होण्याची शक्यता

✒️ हवाई दलाच्या प्रात्यक्षिकांचा थरार

▪️वाराणसीत ‘विंग्ज ओव्हर गंगा ‘ला मोदींची उपस्थिती

✒️ ५१७ जणांच्या सामूहिक शंखनादाने नाशिकच्या नावे इतिहास

▪️शंखनादाच्या विश्वविक्रमाने दुमदुमला गोदाकाठ

✒️ युरोपमध्ये सत्ताधाऱ्यांविरोधात लोकांचा भडका!

▪️लुटालूट, हिंसाचार अन् शेकडोंच्या अटकेने फ्रान्स, इटलीसह अनेक देशात हाहाकार

✒️ मुख्यमंत्री राज्याचं वाळवंट करतायेत, कर्जतचा प्रकल्प पर्यावरण पूरक कसा?

▪️टोरेंट पॉवर कंपनीच्या प्रकल्पावरुन आदित्य ठाकरेंचा थेट हल्लाबोल

✒️ ११४ पदकांसह सायोनारा जपान

▪️पॅरा आशियाई क्रीडा स्पर्धेचे पाचवे पर्व उत्साहात संपन्न

▪️भारत चौथ्या स्थानी

✒️ तिलक वर्माकडे भारताच्या तिन्ही संघात खेळण्याची क्षमता – पठाण

✒️ संघर्षानंतर सिंधू उपविजेती

▪️अग्रमानांकित अॅन से यंगची तीन सेटमध्ये जेतेपदाला गवसणी

✒️ सांगोल्यात मोकाट जनावरे व गाढवे सोडल्यास एक हजारांचा दंड

▪️नगरपरिषदेचा इशारा

✒️ सोलापूर जिल्ह्यात रब्बी पेरणी केवळ १४ हजार हेक्टरवर

▪️गतवर्षी ऑक्टोबरअखेर १४ टक्के; यंदा केवळ ४.४२ टक्के

✒️ सांगोला तालुका विधी सेवा समिती, व सांगोला विधीज्ञ संघ यांच्यावतीने सांगोला तालुक्यात आजपासून सुरक्षित बचपन अभियान

▪️शालेय स्तरावर बालसुरक्षेविषयी होणार जनजागृती

✒️ मांजरी विद्यालयाची पुणे विभागावर ‘कबड्डी’त हुकूमत

▪️५४ वर्षांच्या इतिहासात प्रथमच विभागीय विजेतेपद

▪️राज्यस्तरीय स्पर्धेसाठी ठाण्याकडे झेप

✒️ सांगोला तालुक्यात पशुचाऱ्याचे गंभीर संकट ! केवळ ४९ दिवस पुरेल इतकाच चारा शिल्लक

▪️पशुधन जगविण्यासाठी चारा डेपो सुरू करण्याची मागणी

✒️ श्रीराम महिला भजनी मंडळातर्फे भोंडला उत्साहात साजरा !

▪️गजराजाला साकडे; भरपूर पाऊस पडू दे, दुष्काळाचे सावट दूर होऊ दे, अशी प्रार्थना

✒️ सांगोल्यात अवैध वाळू वाहतुकीवर मोठी कारवाई; १५.१५ लाखांची तीन वाहने जप्त!

▪️माण नदीपात्रात पहाटे पोलिसांची धडक कारवाई

▪️तिघे ताब्यात, एकाचा अंधाराचा फायदा घेत पळ

✒️ तीन दिवसात सोनके तलावातील मोटरा बंद नाही झाल्यास पाण्या अभावी भयंकर परिस्थिती

▪️पाण्यासाठी वणवण झाल्यास तहसीलदार, निरा उजवा अभियंता, एमएसईबी अधिकारी जबाबदार?

✒️ भौतिक सुविधा, किसान रेल्वे कनेक्टीव्हीची अशोक कामटे संघटनेची मागणी

▪️सांगोला रेल्वे स्थानकावर जनसंवाद अभियान उत्साहात संपन्न

सांगोला परिसर आणि राज्यातील बातम्या आणि माहिती सर्वात प्रथम मिळवण्यासाठी तुमच्या Whatsapp ग्रुपवर 78418 55301 हा आमचा नंबर समाविष्ट करा.
-
'सांगोला लाईव्ह'ला बातम्या व जाहिरात देण्यासाठी आजच संपर्क करा : 78418 55301
-
सोशल मीडियावर फॉलो करा -यूट्यूब, इन्स्टाग्राम आणि फेसबुक

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here