सांगोला रेल्वे स्थानकावर जनसंवाद अभियान उत्साहात संपन्न
सांगोला ( प्रतिनिधी):रेल्वे प्रवाशांच्या अडचणी, तक्रारी आणि सूचना थेट जाणून घेऊन रेल्वे सेवा अधिक गतिमान व प्रवासीभिमुख करण्याच्या उद्देशाने सांगोला रेल्वे स्थानकावर ‘जनसंवाद अभियान’ अत्यंत उत्साहात पार पडले. या अभियानादरम्यान रेल्वे प्रशासनाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी स्थानकावर उपस्थित प्रवाशांशी , संघटनांशि प्रत्यक्ष संवाद साधून त्यांच्या समस्या जाणून घेतल्या.

सांगोला रेल्वे स्थानकावर प्रवाशांच्या सुविधा जाणून घेण्यासाठी मध्य रेल्वेने जनसंवाद अभियान आयोजित करण्यात आले . यावेळी मंडल सुरक्षा आयुक्त अनिलकुमार सिंह रेल्वे सुरक्षा बल सोलापूर , निलकंठ शिंदे सर,स्टेशन प्रबंधक अजय कुमार यादव, अशोक खोजा (उप स्टेशन प्रबंधक ), रेल्वे सल्लागार समिती सदस्य मकरंद पाटील यांचेसह कामटे संघटनेच्या पदाधिकाऱ्यांची प्रमुख उपस्थिती होती.

सुरुवातीस सोलापूर मंडलआयुक्त अनिल कुमार सिंह यांचे स्वागत निलकंठ शिंदे सर यांनी शाल ,श्रीफळ देऊन केले.सांगोला येथील भेडसावणारा प्रलंबित प्रश्न म्हणजे मिरज रोड येथील रेल्वे बोगदा,रेल्वे उड्डाणपूल, यामुळे गावची वाहतूक व्यवस्था कोलमडली आहे. येथील काम निकृष्ट दर्जाचे झाले आहे, ते दर्जेदार होणे गरजेचे आहे याकरता संघटनेने वारंवार पाठपुरावा केला आहे तसेच प्लॅटफॉर्मवर सुविधा, प्रवाशांना थांबण्यासाठी शेडची लांबी वाढवावी , दादर -सातारा एक्सप्रेस दररोज सुरू करावी मागण्यांचे निवेदन अशोक कामटे संघटनेच्या वतीने देण्यात आले.

मुंबई वंदे भारत एक्स्प्रेसला पंढरपूर, सांगोला, मिरज आदी भागातून जाणाऱ्या प्रवाशांना कनेक्टविटी करणारी रेल्वे सुरू करावी, सायंकाळच्या हुतात्मा एक्स्प्रेसला कुर्डूवाडी स्थानकावरून पंढरपूर, सांगोला ,मिरज आदी भागात जाण्यासाठी डेमो सुरू करावी, सांगोला स्टेशनवरील सर्क्युलेट एरियामध्ये रस्त्याचे झालेले काँक्रिटीकरण काम निकृष्ट दर्जाचे असून सदर काम दर्जेदार करण्यात यावे.स्टेशनवर कायमस्वरूपी जीआरपी व आर पी एफ पोलिसांची नेमणूक करून या ठिकाणी पोलीस चौकीची मागणी अशोक कामटे संघटनेच्या वतीने करण्यात आली.
प्रवाशांना मिळणाऱ्या विविध सुविधा, स्वच्छता, पिण्याच्या पाण्याची सोय, सुरक्षा यंत्रणा, तिकीट बुकिंग व्यवस्था आणि गाड्यांच्या वेळेबाबत प्रवाशांचे अभिप्राय नौदवून घेण्यात आले. स्थानकावरील स्वच्छताबाबत प्रशासनाचे कौतुक केले. यावेळी शहरातील नागरिक, प्रवासी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

रेल्वे प्रशासनाच्यावतीने सांगोला येथे आयोजित जनसंवाद कार्यक्रमात नागरिक आणि प्रवाशांनी सुचवलेल्या मागण्या रेल्वेच्या माध्यमातून अधिकाधिक सेवा सुविधा उपलब्ध करून देण्याची मागणी शहीद अशोक कामटे संघटनेच्यावतीने करण्यात आली आहे. रेल्वे प्रशासन आणि नागरीक यांच्यात थेट संवादाचे व्यासपीठ निर्माण करून दिल्याबद्दल रेल्वे प्रशासनाचे आभारी आहोत. प्रवाशांच्या मागण्यांचे निवेदन यावेळी रेल्वे प्रशासनास देण्यात आले आहे, याबाबत रेल्वे प्रशासनाने सकारात्मक आश्वासन दिले आहे.
निलकंठ शिंदे सर,
अध्यक्ष:-अशोक कामटे सामाजिक संघटना ,सांगोला

सांगोला परिसर आणि राज्यातील बातम्या आणि माहिती सर्वात प्रथम मिळवण्यासाठी तुमच्या Whatsapp ग्रुपवर 78418 55301 हा आमचा नंबर समाविष्ट करा.
-
'सांगोला लाईव्ह'ला बातम्या व जाहिरात देण्यासाठी आजच संपर्क करा : 78418 55301
-
सोशल मीडियावर फॉलो करा -यूट्यूब, इन्स्टाग्राम आणि फेसबुक



