आलदर हॉस्पिटलच्या मोफत बालआरोग्य शिबिराला उत्स्फूर्त प्रतिसाद; २५० रुग्णांची तपासणी!

0

सांगोला (प्रतिनिधी) : आलदर लहान मुलांचे हॉस्पिटल, सांगोला यांच्या वतीने शनिवार, दिनांक ३१ ऑक्टोबर रोजी पुजारवाडी येथे आयोजित करण्यात आलेल्या मोफत बालआरोग्य शिबिराला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. जिल्हा परिषद प्राथमिक शाळा, पुजारवाडी येथे सकाळी १० ते दुपारी १२ या वेळेत पार पडलेल्या या शिबिरात एकूण २५० रुग्णांची तपासणी करण्यात आली. तसेच गरजू रुग्णांना मोफत औषधांचे वाटप करण्यात आले.

या शिबिराचे उद्घाटन सांगोला नगरपालिकेच्या नगरसेविका श्रीमती तनुजाताई बाळासाहेब एरंडे, शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष श्री. अमर जाधव आणि उपाध्यक्ष श्री. समाधान माने यांच्या हस्ते करण्यात आले.

यावेळी बालरोगतज्ज्ञ डॉ. महावीर आलदर यांनी उपस्थित पालकांना बालकांच्या आरोग्याविषयी विशेष मार्गदर्शन केले. यामध्ये लसीकरणाचे महत्त्व व वेळापत्रक, नवजात बालकांची काळजी, योग्य आहार व पोषण, बालकांची वाढ व विकास तसेच बालकांमधील सामान्य आजार याबाबत सविस्तर माहिती दिली.

ग्रामीण भागातील बालकांना दर्जेदार आरोग्यसेवा उपलब्ध व्हावी आणि आर्थिकदृष्ट्या गरजू कुटुंबांना आरोग्यसेवेचा लाभ मिळावा, या उद्देशाने आयोजित करण्यात आलेल्या या शिबिरातून २५० रुग्णांची तपासणी करून गरजू रुग्णांना मोफत औषधे देण्यात आली.

या प्रसंगी कौसर मुलानी, स्वाती माने, आम्रपाली माने, राजनंदिनी काटे, सौ. चंदनशिवे, जय बनकर, भारत लवटे गुरुजी, मुख्याध्यापक श्री. पोपट मोरे, डॉ. निकिता कोळी, डॉ. पवन शिरसाट, आर्यन आलदर, सुनील बुरुंगे यांच्यासह शाळा व्यवस्थापन समितीचे सदस्य, पालक, शिक्षक व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.या शिबिराच्या यशस्वितेसाठी शाळा व्यवस्थापन समिती, शिक्षक, पालक आणि ग्रामस्थांनी सहकार्य केले.

सांगोला परिसर आणि राज्यातील बातम्या आणि माहिती सर्वात प्रथम मिळवण्यासाठी तुमच्या Whatsapp ग्रुपवर 78418 55301 हा आमचा नंबर समाविष्ट करा.
-
'सांगोला लाईव्ह'ला बातम्या व जाहिरात देण्यासाठी आजच संपर्क करा : 78418 55301
-
सोशल मीडियावर फॉलो करा -यूट्यूब, इन्स्टाग्राम आणि फेसबुक

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here