अशोक कामटे संघटनेच्या पाठपुराव्याला यश
सांगोला (प्रतिनिधी): सांगोला भागातील अनेक विद्यार्थी शिक्षणासाठी कराड येथे आहेत अनेक नागरिक नोकरीनिमित्त चिपळूण खेड दापोली या भागात आहेत पण सांगोला येथून डायरेक्ट बससेवा नसल्याने विद्यार्थी पालक नोकरवर्ग यांची ये जा करण्यासाठी गैरसोय दूर व्हावी व कायमस्वरूपी कराड मार्गे कोकणात जाणारी बस सुरु व्हावी अशी प्रवाशांची मागणी होती या मागणीचा विचार करून शहीद अशोक कामटे संघटनेचे अध्यक्ष श्री निलकंठ शिंदे सर

व सोलापूर जिल्हा प्रवाशी सेवा संघ अध्यक्ष श्री संजय पाटील सर व कुमार नरखडे व पत्रकार रविराज शेटे यांनी महाव्यवस्थापक मुबई, विभाग नियंत्रक सोलापूर व सांगोला आगार यांच्याकडे सतत पाठपुरावा करून दिनांक १नोव्हेंबर २०२६ पासून सांगोला आगारातून सांगोला -चिपळूण कोकणकन्या बस सेवा सांगोला येथून सुरु करण्यात येणार आहे ती दररोज सकाळी ७.०० वा सांगोला येथून नाझरे, आटपाडी, भिवघाट, विटा, कराड, कोयनानगर, पाटण मार्गे दुपारी १.०० वा चिपळूण ला पोहचणार असून तीच बस चिपळूण येथून ती दुपारी १.३० वा सुटून वरील मार्गे सांगोला येथे रात्री ८. ०० पोहचणार आहे.

या बससेवेमुळे या भागातील प्रवाशांना थेट कोकणात जाण्यासाठी चांगली सोय होणार आहे तसेच कराड भागात शिक्षणासाठी असलेल्या विद्यार्थी पालक वर्गाची फार मोठी सोय होणार असल्यामुळे आता चढ उताराचा त्रास व गैरसोय कमी होणार आहे तरी या भागातील प्रवाशी विद्यार्थी यांनी या सेवेचा लाभ घ्यावा व ही सेवा कायम स्वरूपात सुरु रहावी यासाठी या बसने जास्तीत जास्त प्रवास करून सहकार्य करावे तसेच या सेवेला महिला जेष्ठ नागरिक अमृत जेष्ठ नागरिक अशा सर्व सवलती लागू राहतील.

या सवलतीचा लाभ घेऊन प्रवास करावा असे आवाहन एसटी प्रशासनाकडून करण्यात आले असून ही सेवा सुरु करण्यासाठी विभाग नियंत्रक श्री गोंजारी साहेब विभागीय वाहतूक अधिकारी संजय भोसले व विभागीय वाहतूक सहाय्यक श्रीपाद पोतदार सांगोला आगार प्रमुख श्री सरगर साहेब व त्यांच्या सर्व सहकाऱ्यांनी मोलाचे सहकार्य केले त्याबद्दल त्यांचे अभिनंदन व आभार. सदरच्या बस सेवा सुरू होण्याकरिता सर्व संघटनानि प्रयत्न केल्याबद्दल सर्वांचे अभिनंदन होत आहे.
सांगोला परिसर आणि राज्यातील बातम्या आणि माहिती सर्वात प्रथम मिळवण्यासाठी तुमच्या Whatsapp ग्रुपवर 78418 55301 हा आमचा नंबर समाविष्ट करा.
-
'सांगोला लाईव्ह'ला बातम्या व जाहिरात देण्यासाठी आजच संपर्क करा : 78418 55301
-
सोशल मीडियावर फॉलो करा -यूट्यूब, इन्स्टाग्राम आणि फेसबुक




