दुष्काळाच्या पार्श्वभूमीवर खंडागळे मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटलचा दिलासादायक निर्णय!

0

शेतकरी, मजूर व गरजू रुग्णांना मोफत तसेच सवलतीच्या दरात वैद्यकीय सुविधा; २४ तास सेवा उपलब्ध

सांगोला (प्रतिनिधी): सध्या दुष्काळी परिस्थितीमुळे शेतकरी, शेतमजूर आणि सर्वसामान्य नागरिक आर्थिक अडचणींचा सामना करत आहेत. अशा परिस्थितीत सामाजिक बांधिलकी जपत खंडागळे मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटलच्या वतीने शेतकरी, मजूर आणि गरजू रुग्णांसाठी मोफत तसेच अल्प दरात वैद्यकीय सुविधा उपलब्ध करून देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

या उपक्रमांतर्गत रुग्णांना ओपीडी सेवा, विविध वैद्यकीय तपासण्या, रुग्णालयात दाखल होण्याची सुविधा तसेच आवश्यक शस्त्रक्रियांच्या दरामध्ये विशेष सवलत देण्यात येणार आहे. आर्थिक परिस्थितीमुळे कोणत्याही गरजू रुग्णाला उपचारांपासून वंचित राहावे लागू नये, हा या उपक्रमामागील मुख्य उद्देश आहे.

तसेच खंडागळे मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटल रुग्णांच्या सेवेसाठी २४ तास उपलब्ध राहणार आहे.दुष्काळाच्या कठीण काळात शेतकरी, कष्टकरी आणि गरजू नागरिकांच्या पाठीशी उभे राहण्याचा आमचा प्रयत्न असून, अधिकाधिक गरजू रुग्णांनी या सुविधेचा लाभ घ्यावा, असे आवाहन डॉ.परेश खंडागळे यांनी केले आहे.

 

सांगोला परिसर आणि राज्यातील बातम्या आणि माहिती सर्वात प्रथम मिळवण्यासाठी तुमच्या Whatsapp ग्रुपवर 78418 55301 हा आमचा नंबर समाविष्ट करा.
-
'सांगोला लाईव्ह'ला बातम्या व जाहिरात देण्यासाठी आजच संपर्क करा : 78418 55301
-
सोशल मीडियावर फॉलो करा -यूट्यूब, इन्स्टाग्राम आणि फेसबुक

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here