माढा: रयत शिक्षण संस्थेचे कला व वाणिज्य महाविद्यालय माढा व पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठ सोलापूर यांच्यावतीने राष्ट्रीय सेवा योजना विभागामार्फत केवड ता.माढा या शिबिरामध्ये सांस्कृतिक कार्यक्रमाचे उद्घाटक म्हणून बोलत असताना, सोलापूर जिल्हा परिषदेच्या माजी अध्यक्षा डॉ. निशिगंधा माळी यांनी असे म्हटले की कॉलेज जीवनामध्येच विद्यार्थ्यांनी आई-वडिलांचे, गुरुजनांचे व समाज घटकातील लोकांच्या प्रति कृतज्ञता व्यक्त करायला शिकले पाहिजे तरच जीवनामध्ये यशस्वी होता येते.
या कार्यक्रमाचे अध्यक्ष डॉ.दत्तात्रेय काळेल कार्यक्रम अधिकारी एन एस एस हे होते. या कार्यक्रम प्रसंगी महाविद्यालयाचे कार्यालय प्रमुख श्री हनुमंत खपाले, भारत लटके, सागर धर्मे प्रा. चतुर्भुज गिड्डे, डॉ. वंदना कवितके, प्रा. वैशाली गुंड, प्रा. लक्ष्मण जतकर, प्रा. शुभम चवरे, प्रा. संकल्प बारबोले प्रा. प्रसाद पवार, प्रा. ज्योती राजमाने यांच्यासह बहुसंख्य विद्यार्थी व ग्रामस्थ उपस्थित होते.
सांगोला परिसर आणि राज्यातील बातम्या आणि माहिती सर्वात प्रथम मिळवण्यासाठी तुमच्या Whatsapp ग्रुपवर 78418 55301 हा आमचा नंबर समाविष्ट करा.
-
'सांगोला लाईव्ह'ला बातम्या व जाहिरात देण्यासाठी आजच संपर्क करा : 78418 55301
-
सोशल मीडियावर फॉलो करा -यूट्यूब, इन्स्टाग्राम आणि फेसबुक