सांगोला विद्यामंदिरमध्ये ८० व्या स्वातंत्र्यदिनानिमित्त ध्वजारोहण उत्साहात संपन्न

0

सांगोला (प्रतिनिधी):सांगोला तालुका शिक्षण प्रसारक मंडळ, सांगोला संचलित सांगोला विद्यामंदिर प्रशाला व ज्युनिअर कॉलेज, सांगोला येथे ८० व्या भारतीय स्वातंत्र्यदिनानिमित्त १५ ऑगस्ट २०२६ रोजी संस्थाध्यक्ष प्रा.प्रबुद्धचंद्र झपके यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले.

कार्यक्रमाच्या सुरुवातीला संस्थेचे संस्थापक अध्यक्ष, १९४२ च्या ‘चले जाव’ आंदोलनातील थोर स्वातंत्र्यसेनानी कै.गुरुवर्य बापूसाहेब झपके यांच्या तैलचित्रास सेवानिवृत्त पर्यवेक्षक दामोदर नागणे यांचे हस्ते पुष्पहार अर्पण करून कृतज्ञतापूर्वक अभिवादन करण्यात आले.
यानंतर प्रा.धनाजी चव्हाण यांनी प्रस्ताविकात ८० व्या स्वातंत्र्यदिनाची विकसित भारत २०४७ आणि राष्ट्र प्रथम ही संकल्पना तरुणांच्या मानसिक, वैचारिक व नैतिक प्रगल्भतेतून साकार होईल.असे सांगत स्वातंत्र्याचा अर्थ स्वैराचार नव्हे. आजच्या माहिती आणि मोबाईलच्या महापुरात भरकटणाऱ्या तरुणाईला सावरण्यासाठी पालक व शिक्षकांनी घरातील अबोलाचे पारतंत्र्य झुगारून पाल्यांशी मैत्रीपूर्ण संवादाची मुहूर्तमेढ रोवली पाहिजे असे सांगितले.


याप्रसंगी प्रशालेचे प्राचार्य चारुदत्त जगताप यांनी इयत्ता १० वी आणि १२ वीच्या विद्यार्थ्यांना कॉपीमुक्त अभियान तसेच एन.सी.सी.विद्यार्थ्यांना शपथ दिली. त्यानंतर इयत्ता ८ वीच्या विद्यार्थ्यांनी कवायतीचे सादरीकरण केले. प्रशाला व ज्युनिअर कॉलेज सर्वोत्तम विद्यार्थ्यांसाठी देणगीसाठी रोख रक्कम दिल्याबद्दल ज्योत्स्ना घोंगडे यांचा संस्था कार्यकारिणी सदस्य शिलाकाकी झपके यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. त्यानंतर सेवानिवृत्त प्राचार्य भीमाशंकर पैलवान,माजी उपमुख्याध्यापक अब्दुलगणी सय्यद यांच्या हस्ते विज्ञान भित्तीपत्रिकेचे उद्घाटन करण्यात आले.
या मंगल सोहळ्यासाठी ड्रीम फाउंडेशनचे संस्थापक अध्यक्ष काशिनाथ भतगुणकी यांची प्रमुख उपस्थिती लाभली.याप्रसंगी संस्थेचे पदाधिकारी, सेवानिवृत्त,विद्यामान प्राचार्य, उपमुख्याध्यापक,उपप्राचार्य, पर्यवेक्षक,शिक्षक,शिक्षकेत्तर कर्मचारी,पालक, प्रतिष्ठित
नागरिक आणि विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन आशितोष नष्टे यांनी केले, तर उपमुख्याध्यापक प्रदिप धुकटे यांनी आभार मानले.

माईंड किंग नरेंद्र सिंह यांचा तरुणाईला मंत्र आणि अफाट स्मरणशक्तीचा थक्क करणारा प्रत्यय
या स्वातंत्र्यदिन सोहळ्यासाठी प्रमुख पाहुणे म्हणून राजस्थानच्या अजमेरवरून आमंत्रित सुप्रसिद्ध माईंड किंग प्रेरणादायी वक्ते आणि लाईफ कोच नरेंद्र सिंह यांनी उपस्थितांवर आपल्या विचारांची जबरदस्त छाप पाडली. आजच्या सोशल मीडियाच्या मायाजालात विचलित होणाऱ्या तरुणाईच्या मनाला एकाग्र करण्याचे आणि त्यांना मानसिकदृष्ट्या कणखर बनवण्याचे अत्यंत मोलाचे मार्गदर्शन त्यांनी केले. तरुणांच्या मनावर ताबा आणि डोळ्यांत विधायक स्वप्ने असतील तरच विकसित भारताची संकल्पना यशस्वी होईल असा ठाम विश्वास त्यांनी व्यक्त केला.केवळ शाब्दिक मार्गदर्शन नव्हे, तर त्यांनी आपल्या अफाट बुद्धिमत्तेची आणि मेंदूच्या क्षमतेची प्रत्यक्ष प्रचितीच यावेळी दिली. आपल्या भाषणादरम्यान त्यांनी शिक्षकाला मंचावर पाचारण केलेत्यांची जन्मतारीख विचारली आणि अवघ्या काही सेकंदात अचूक गणित करून त्यांच्या जन्माचा वार सांगून संपूर्ण उपस्थितांना अचंबित केले. माईंड किंग या त्यांच्या बिरुदावलीची सार्थकता सिद्ध करणारा हा विलक्षण प्रसंग सर्वांसाठीच थक्क करणारा आणि संस्मरणीय ठरला.

सांगोला परिसर आणि राज्यातील बातम्या आणि माहिती सर्वात प्रथम मिळवण्यासाठी तुमच्या Whatsapp ग्रुपवर 78418 55301 हा आमचा नंबर समाविष्ट करा.
-
'सांगोला लाईव्ह'ला बातम्या व जाहिरात देण्यासाठी आजच संपर्क करा : 78418 55301
-
सोशल मीडियावर फॉलो करा -यूट्यूब, इन्स्टाग्राम आणि फेसबुक

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here