माणगंगा परिवार अर्बन को-ऑप. क्रेडीट सोसायटीतर्फे कृषिदिन व राष्ट्रीय डॉक्टर दिन उत्साहात साजरा

0

सांगोला (प्रतिनिधी ): १ जुलै कृषिदिन तसेच राष्ट्रीय डॉक्टर दिनाचे औचित्य साधून माणगंगा परिवार अर्बन को-ऑप. क्रेडीट सोसायटीच्या सांगोला, मंगळवेढा, वाकी शिवणे, महूद, हातीद व नाझरे या सर्व शाखांच्या वतीने भूमिपुत्र शेतकरी आणि समाजाच्या आरोग्यसेवेसाठी अहोरात्र कार्य करणाऱ्या डॉक्टरांचा सन्मान करून सामाजिक बांधिलकी जपणारा स्तुत्य उपक्रम राबविण्यात आला.

या उपक्रमांतर्गत प्रत्येक शाखेच्या कार्यक्षेत्रातील प्रगतशील शेतकरी तसेच विविध क्षेत्रांत उल्लेखनीय सेवा देणाऱ्या डॉक्टरांना पुष्पगुच्छ, शाल, श्रीफळ व सन्मानचिन्ह प्रदान करून गौरविण्यात आले. यावेळी उपस्थित मान्यवरांनी शेतकरी हा देशाच्या अर्थव्यवस्थेचा कणा असून डॉक्टर हे समाजाच्या आरोग्याचे खरे शिल्पकार आहेत, असे गौरवोद्गार काढत त्यांच्या योगदानाबद्दल कृतज्ञता व्यक्त केली.

माणगंगा परिवार अर्बन को-ऑप. क्रेडीट सोसायटी ही आर्थिक सेवांसोबतच सामाजिक उत्तरदायित्वाची जाणीव ठेवून विविध समाजोपयोगी उपक्रम सातत्याने राबवत आहे. कृषिदिन आणि राष्ट्रीय डॉक्टर दिनानिमित्त आयोजित करण्यात आलेला हा सन्मान सोहळा त्याच सामाजिक बांधिलकीचा एक भाग असून, सर्व स्तरांतून या उपक्रमाचे कौतुक करण्यात आले.

सांगोला, मंगळवेढा, वाकी शिवणे, महूद, हातीद आणि नाझरे या सर्व शाखांमध्ये कार्यक्रम उत्साहपूर्ण वातावरणात पार पडला. सन्मानित शेतकरी व डॉक्टरांनी संस्थेप्रती कृतज्ञता व्यक्त करत अशा उपक्रमांमुळे समाजातील विविध घटकांप्रती आदर व्यक्त करण्याची प्रेरणा मिळत असल्याचे सांगितले.

या कार्यक्रमास संस्थेचे पदाधिकारी, शाखा व्यवस्थापक, कर्मचारी, मान्यवर नागरिक, शेतकरी बांधव तसेच वैद्यकीय क्षेत्रातील मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमाचे नियोजन व आयोजन माणगंगा परिवार अर्बन को-ऑप. क्रेडीट सोसायटीच्या सर्व शाखांनी यशस्वीरीत्या केले.

सांगोला परिसर आणि राज्यातील बातम्या आणि माहिती सर्वात प्रथम मिळवण्यासाठी तुमच्या Whatsapp ग्रुपवर 78418 55301 हा आमचा नंबर समाविष्ट करा.
-
'सांगोला लाईव्ह'ला बातम्या व जाहिरात देण्यासाठी आजच संपर्क करा : 78418 55301
-
सोशल मीडियावर फॉलो करा -यूट्यूब, इन्स्टाग्राम आणि फेसबुक

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here