पत्रकारांना धमकी व अपशब्द प्रकरणी तहसीलदार व पोलीस निरीक्षकांना निवेदन 

0

सांगोला (तालुका प्रतिनिधी): पत्रकारांना धमकी देणे, शिवीगाळ करणे तसेच पत्रकारांबाबत अपमानास्पद भाषा वापरल्याचा निषेधार्थ द जर्नलिस्ट असोसिएशन राष्ट्रीय पत्रकार संघटन व पत्रकार सुरक्षा समिती, महाराष्ट्रच्या वतीने तहसीलदार कु.बाळूताई भागवत व सांगोला पोलीस स्टेशनचे वरीष्ठ पोलीस निरीक्षक विनोद घुगे यांना निवेदन देण्यात आले.

पत्रकार सुरक्षा समितीचे प्रदेशाध्यक्ष यशवंत पवार व द जर्नलिस्ट असोसिएशनचे कायदेशीर विभागाचे राष्ट्रीय सरचिटणीस ॲड. अयुब पटेल यांच्या नेतृत्वाखाली हे निवेदन सादर करण्यात आले. निवेदनात नमूद केल्याप्रमाणे, खासदार संजय दिना पाटील यांनी सार्वजनिक कार्यक्रमात पत्रकारांविषयी अवमानकारक वक्तव्य केल्याचा निषेध करण्यात आला आहे.अशा प्रकारच्या वक्तव्यामुळे पत्रकार आणि पत्रकारिता या लोकशाहीच्या चौथ्या स्तंभावर दबाव आणण्याचा प्रयत्न होत असल्याचे निवेदनात म्हटले आहे.

पत्रकारांशी गैरवर्तन करणे, धमकी देणे आणि अपशब्द वापरणे हे निषेधार्ह असून संबंधित प्रकरणाची शासनाने गंभीर दखल घ्यावी, अशी मागणी करण्यात आली. तसेच संबंधितांविरुद्ध योग्य ती कायदेशीर कारवाई करून पत्रकार संरक्षण कायद्याअंतर्गत पत्रकारांना संरक्षण मिळावे, अशी मागणीही निवेदनाद्वारे करण्यात आली.

यावेळी पत्रकार सुरक्षा समितीचे व द जर्नलिस्ट असोसिएशनचे ॲड.अयुब पटेल, प्रताप येलपले, मिर्झागालिब मुजावर, मिनाज खतीब, बबन चव्हाण,बाळासाहेब वाघमारे,गुलचंद भोरे, सचिन मंडले, दीपक होवाळ, तनवीर मुजावर, शशिकांत हातेकर, शिवाजी इंगोले, कुलदीप होवाळ यांच्या सह पदाधिकारी व सदस्य मोठ्या संख्येने उपस्थित होते.   संबंधित घटनेचा समितीने तीव्र निषेध व्यक्त केला असून पत्रकारांच्या सन्मान व सुरक्षिततेसाठी लढा सुरूच राहील, असा इशाराही देण्यात आला.

 

पत्रकारांचा अपमान व पत्रकारांवरील अन्याय खपवून घेणार नाही:- ॲड. अयुब पटेल

पत्रकारांचा अपमान करणे किंवा त्यांच्यावर अन्याय करणे म्हणजे अभिव्यक्ती स्वातंत्र्यावर घाला घालण्यासारखे आहे. अशा घटनांचा आम्ही तीव्र निषेध करीत असून संबंधितांना कायद्याच्या चौकटीत योग्य कारवाई व्हावी, अशी मागणी करीत आहोत. पत्रकारांच्या सन्मानासाठी आणि सुरक्षिततेसाठी सर्व स्तरावर ठोस भूमिका घेण्यात येईल.

“पत्रकारांचा अपमान व पत्रकारांवरील अन्याय खपवून घेतला जाणार नाही. पत्रकारांच्या हक्कांचे रक्षण करण्यासाठी आम्ही सदैव त्यांच्या पाठीशी ठामपणे उभे राहू,” अशी प्रतिक्रिया ॲड.अयुब पटेल यांनी दिली.

सांगोला परिसर आणि राज्यातील बातम्या आणि माहिती सर्वात प्रथम मिळवण्यासाठी तुमच्या Whatsapp ग्रुपवर 78418 55301 हा आमचा नंबर समाविष्ट करा.
-
'सांगोला लाईव्ह'ला बातम्या व जाहिरात देण्यासाठी आजच संपर्क करा : 78418 55301
-
सोशल मीडियावर फॉलो करा -यूट्यूब, इन्स्टाग्राम आणि फेसबुक

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here