वामनराव शिंदे साहेब आदर्श विद्यालयात आकाश दिवा कार्यशाळा उत्साहात संपन्न

0

सांगोला (प्रतिनिधी): वामनराव शिंदे साहेब आदर्श विद्यालयात विद्यार्थ्यांकरिता आकाश दिवा (कंदील) बनवण्याची कार्यशाळा आयोजित करण्यात आली होती. यामध्ये प्रशालेतील या उपक्रमात विद्यार्थ्यांनी उत्स्फूर्तपणे सहभाग नोंदवला होता. या कार्यशाळेचे उद्घाटन मुख्याध्यापक विठ्ठलपंत शिंदे सर यांनी केले .

दिवाळीत घराची सजावट करण्यासाठी कागदी आकाशकंदील (आकाश दिवा) घरी सहज बनवावा. पारंपारिक पद्धतीने आकाशकंदील बनवण्याची सोपी कृती असल्याचे प्रशिक्षक शिक्षक मित्र ऋषिकेश पोटे (कराड )व नेहा पोटे यांनी कृतीद्वारे विद्यार्थ्यांना सांगितले .

याकरिता आवश्यक साहित्य – रंगीत पतंगाचे किंवा क्राफ्ट पेपर, पातळ काड्या (बांबूच्या किंवा सुक्या बांधून या कार्यशाळेत विविध आकाश कंदीलच्या कृती विद्यार्थ्यांना संकल्पना सांगितले व त्याचे प्रात्यक्षिक विद्यार्थ्यांकडून करून घेतले. सांगाडा तयार करणे, कागद कापणे, कागद चिटकवणे, डिझाईन आणि कशिदा, दिवा किंवा प्रकाश योजना या सर्व कृती विद्यार्थ्यांना कृतीद्वारे दाखविल्या.

तुम्हाला पारंपारिक कागदी कंदील बनवायचा आहे की कागदी कप किंवा वेस्ट मटेरियल वापरून सोपा कंदील बनवायचा आहे, हे सांगितले. या कार्यशाळेत प्रशिक्षकाचे स्वागत प्रशालेचे मुख्याध्यापक विठ्ठलपंत शिंदे सर यांनी केले. कार्यशाळा यशस्वी करण्यासाठी प्रशालेतील शिक्षकांचे विद्यार्थ्यांना मार्गदर्शन मिळाले. शेवटी आभार गोडसे मॅडम यांनी मानले.या प्रशिक्षण यशस्वीतेसाठी प्रशालेतील शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी यांनी परिश्रम घेतले

सांगोला परिसर आणि राज्यातील बातम्या आणि माहिती सर्वात प्रथम मिळवण्यासाठी तुमच्या Whatsapp ग्रुपवर 78418 55301 हा आमचा नंबर समाविष्ट करा.
-
'सांगोला लाईव्ह'ला बातम्या व जाहिरात देण्यासाठी आजच संपर्क करा : 78418 55301
-
सोशल मीडियावर फॉलो करा -यूट्यूब, इन्स्टाग्राम आणि फेसबुक

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here