सांगोला (प्रतिनिधी): कोणार्क, एल टी टी एक्सप्रेसला कुर्डूवाडी जंक्शन येथे थांबा मंजूर करावा या मागणीचे निवेदन शहीद अशोक कामटे बहुउद्देशीय सामाजिक संघटनेच्या वतीने मध्य रेल्वेचे जनरल मॅनेजर( मुंबई )यांना देण्यात आले.

गाडी क्रमांक, 18520 डाऊन, 18519 अप ,मुंबई लोकमान्य टिळक– विशाखापट्टणम एक्सप्रेस , गाडी क्र, 11019 डाऊन, 11020 अप ,मुंबई –भुवनेश्वर एक्सप्रेस कुर्डुवाडी रेल्वे स्टेशन येथे अधिकृत थांबा मंजूर करण्यात यावा.
कुर्डुवाडी मोठे जंक्शन रेल्वे स्टेशन आहे .येथून पंढरपूर, मिरज , कोल्हापूर व बार्शी, लातूर, मराठवाडा , विदर्भाकडे जाणारी व येणारी प्रवासी संख्या खूप जास्त आहे , मुंबई येथून येणारी इंद्रायणी/हुतात्मा एक्सप्रेस सोलापूरकडे येणारी गाडीला कायम गर्दी असते ,इंद्रायणी/ हुतात्मा एक्सप्रेसच्या पाठीमागे विशाखापट्टणम एक्सप्रेस असते सदर गाडीला कुर्डुवाडी रेल्वे स्टेशन थांबा दिल्यास सांगोला ,पंढरपूरकडे व लातूरकडे जानाऱ्या प्रवासी यांची सोय होऊ शकते, तसेच गाडी नंबर, 11019 डाऊन, 11020 अप ,मुंबई –भुवनेश्वर–मुंबई (कोणार्क एक्सप्रेस)रेल्वेस कुर्डुवाडी रेल्वे स्टेशनवर थांबा देण्यात यावा.

,विशाखापट्टणम, कोणार्क या रेल्वेस गाडीला कुर्डुवाडी रेल्वे स्टेशनवर जाताना व येताना थांबा दिल्यास सोलापूर जिह्यातील नागरिकांची जगन्नाथ पुरी येथे जाण्याकरिता प्रवाशांची सोय होईल अशी मागणी केली आहे.
तसेच रेल्वे प्रशासनाने भुवनेश्वर –मुंबई एक्सप्रेस रेल्वेस जेऊर येथे थांबा दिलेला आहे अन् कुर्डूवाडी जंक्शन येथे थांबा मंजूर नाही हा फरक कशासाठी ? तुलनेने जेऊर स्टेशन लहान आहे नि कुर्डूवाडी हे जंक्शन आहे..यामुळे रेल्वेच्या थांब्याबाबत उदासीन धोरण दिसून येते, या समस्याबाबत रेल्वे प्रशासनाने गांभीर्याने विचार, सर्वे करून तात्काळ कुर्डूवाडी जंक्शन थांबा मिळणे आवश्यक आहे, या निवेदनाच्या प्रती राज्यसभेचे नूतन खासदार प्रा डॉ ज्योतीताई वाघमारे यांनीही देण्यात आले आहेत. यावेळी त्यांनी सदर थांब्याबाबत रेल्वे बोर्ड,मंत्रालय यांच्याकडे पाठपुरावा करणार असल्याचे सांगितले , यावेळी अशोक कामटे संघटनेचे सदस्य व पदाधिकारी उपस्थित होते.

सांगोला परिसर आणि राज्यातील बातम्या आणि माहिती सर्वात प्रथम मिळवण्यासाठी तुमच्या Whatsapp ग्रुपवर 78418 55301 हा आमचा नंबर समाविष्ट करा.
-
'सांगोला लाईव्ह'ला बातम्या व जाहिरात देण्यासाठी आजच संपर्क करा : 78418 55301
-
सोशल मीडियावर फॉलो करा -यूट्यूब, इन्स्टाग्राम आणि फेसबुक



