‘आलदर हॉस्पिटल’मध्ये प्रसूतीनंतर गुदमरलेल्या कमी दिवसाच्या नवजात बालकाला जीवनदान!

0

सांगोला (प्रतिनिधी):वैद्यकीय क्षेत्रातील प्रगती आणि डॉक्टरांच्या प्रयत्नांमुळे सांगोला येथील आलदर हॉस्पिटलमध्ये एका नवजात बालकाला मृत्यूच्या दारातून सुखरूप बाहेर काढण्यात यश आले आहे. कडलास (ता. सांगोला) येथील या चिमुरड्याला यशस्वी उपचारांनंतर नवीन आयुष्य मिळाले आहे.

कडलास येथील प्रसुतीनंतर गुदमरलेल्या कमी दिवसाच्या नवजात बालकाला श्वसनाचा तीव्र त्रास जाणवू लागला. बाळाची गंभीर अवस्था पाहून डॉक्टरांनी विलंब न लावता तातडीने उपाययोजना सुरू केल्या. बाळाला श्वास घेता यावा यासाठी त्याला कृत्रिम श्वसन प्रणालीवर ठेवण्यात आले. डॉक्टरांचे बारकाईने लक्ष आणि योग्य उपचार यामुळे बाळाच्या प्रकृतीत सकारात्मक बदल दिसून आले.

उपचारांना प्रतिसाद देत बाळाच्या श्वसन प्रक्रियेत लक्षणीय सुधारणा झाली. त्यानंतर काही दिवस बाळाला निरीक्षणाखाली ठेवून नॉर्मल ऑक्सिजन देण्यात आला. बाळाने उपचारांना दिलेली साथ आणि डॉक्टरांचे कौशल्य यामुळे बाळ आता पूर्णपणे धोक्याबाहेर आहे. उपचार यशस्वी ठरल्यानंतर बाळाच्या श्वसन प्रक्रियेत सुधारणा झाली.

सुरक्षिततेचा उपाय म्हणून पुढील काही दिवस बाळाला नैसर्गिक ऑक्सिजनवर ठेवून त्याच्या प्रकृतीवर लक्ष ठेवण्यात आले. बाळाची प्रकृती आता पूर्णपणे सुधारली असून, डॉक्टरांनी त्याला सुखरूप घरी सोडले आहे.

कडलास येथील या बाळाला मिळालेल्या जीवदानामुळे कुटुंबीयांनी डॉक्टरांचे आणि आलदर हॉस्पिटल प्रशासनाचे आभार मानले आहेत. ग्रामीण भागातील मुलांसाठी अशा प्रकारच्या अत्याधुनिक वैद्यकीय सुविधा उपलब्ध झाल्यामुळे समाधान व्यक्त होत आहे.

सांगोला परिसर आणि राज्यातील बातम्या आणि माहिती सर्वात प्रथम मिळवण्यासाठी तुमच्या Whatsapp ग्रुपवर 78418 55301 हा आमचा नंबर समाविष्ट करा.
-
'सांगोला लाईव्ह'ला बातम्या व जाहिरात देण्यासाठी आजच संपर्क करा : 78418 55301
-
सोशल मीडियावर फॉलो करा -यूट्यूब, इन्स्टाग्राम आणि फेसबुक

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here