दानशूर पालकत्वाचा आदर्श; वाढदिवस साजरा केला ज्ञानदानाच्या अनोख्या उपक्रमातून!
कोळे (प्रतिनिधी): वाढदिवस म्हटले की केक, भेटवस्तू आणि आनंदाचा उत्सव डोळ्यांसमोर येतो. मात्र, या आनंदाला सामाजिक बांधिलकीची जोड देत जिल्हा परिषद प्राथमिक शाळा कोळे मुली व मुले, कोळे येथील विद्यार्थिनी कु. कार्तिकी सचिन शेटे हिच्या वाढदिवसानिमित्त तिचे वडील श्री. सचिन विलास शेटे यांनी शाळेच्या ग्रंथालयासाठी ५ हजार रुपयांची देणगी देऊन दानशूर पालकत्वाचा आदर्श समाजासमोर ठेवला.

श्री. सचिन विलास शेटे यांनी दिलेल्या या देणगीतून शाळेच्या ग्रंथालयासाठी विविध पुस्तके खरेदी करण्यात येणार आहेत. या पुस्तकांमुळे विद्यार्थ्यांना वाचनाची गोडी लागण्यास, ज्ञानात भर पडण्यास आणि त्यांच्या व्यक्तिमत्त्व विकासास मदत होणार आहे. या उपक्रमाचे महत्त्व लक्षात घेऊन शाळेच्या वतीने श्री. शेटे यांचा छोटेखानी सत्कार करण्यात आला.

वाढदिवसाच्या निमित्ताने केलेल्या या उपक्रमातून केवळ आनंद साजरा न करता विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक प्रगतीसाठी योगदान देण्याचा प्रेरणादायी संदेश देण्यात आला. ‘वाढदिवसाचा आनंद ज्ञानदानातून’ ही संकल्पना प्रत्यक्षात उतरवत श्री. शेटे यांनी समाजापुढे एक सकारात्मक उदाहरण निर्माण केले आहे.

पुस्तके ही विद्यार्थ्यांच्या ज्ञानाची खरी संपत्ती असून वाचनातूनच विचारशक्ती, कल्पनाशक्ती आणि जीवनाकडे पाहण्याचा व्यापक दृष्टिकोन विकसित होतो. त्यामुळे शाळेच्या ग्रंथालयासाठी दिलेली ही देणगी विद्यार्थ्यांच्या भविष्यासाठी मोलाची ठरणार आहे.

या उदार देणगीबद्दल शाळेच्या वतीने श्री. सचिन विलास शेटे यांचे मनःपूर्वक आभार व्यक्त करण्यात आले. तसेच कु. कार्तिकी सचिन शेटे हिला वाढदिवसानिमित्त शुभेच्छा देत तिच्या उज्ज्वल भविष्यासाठी सदिच्छा व्यक्त करण्यात आल्या.

सांगोला परिसर आणि राज्यातील बातम्या आणि माहिती सर्वात प्रथम मिळवण्यासाठी तुमच्या Whatsapp ग्रुपवर 78418 55301 हा आमचा नंबर समाविष्ट करा.
-
'सांगोला लाईव्ह'ला बातम्या व जाहिरात देण्यासाठी आजच संपर्क करा : 78418 55301
-
सोशल मीडियावर फॉलो करा -यूट्यूब, इन्स्टाग्राम आणि फेसबुक



