सांगोल्यात जिल्हास्तरीय शालेय मुलींच्या कराटे स्पर्धेचे थाटात उद्घाटन

0

 

डॉ. रणजीत केळकर व गिरीश गायकवाड-पाटील यांच्या हस्ते शुभारंभ

सांगोला (प्रतिनिधी) : महाराष्ट्र शासनाच्या क्रीडा व युवा सेवा संचालनालय, महाराष्ट्र राज्य, पुणे अंतर्गत जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय व क्रीडा परिषद, सोलापूर यांच्या संयुक्त विद्यमाने आणि स्पोर्ट्स कराटे असोसिएशन, सोलापूर यांच्या सहकार्याने आयोजित जिल्हास्तरीय शालेय मुलींच्या कराटे क्रीडा स्पर्धेचे उद्घाटन मंगळवार, दिनांक २७ ऑक्टोबर २०२६ रोजी सांगोल्यात थाटात करण्यात आले.

सांगोल्यातील प्रसिद्ध स्त्रीरोगतज्ज्ञ डॉ. रणजीत केळकर आणि गिरीश गायकवाड-पाटील यांच्या हस्ते स्पर्धेचे उद्घाटन झाले. यावेळी जिल्हा क्रीडा अधिकारी राहुल गायकवाड, तालुका संयोजक काशिलिंग शेळके सर, कराटे असोसिएशनचे जिल्हाध्यक्ष जी. के. वाघमारे सर आणि ज्येष्ठ कराटे प्रशिक्षक सुनील वाघमारे सर उपस्थित होते.

या जिल्हास्तरीय स्पर्धा राष्ट्रीय पंचांच्या मार्गदर्शनाखाली पार पडत आहेत. स्पर्धेचे कामकाज निजेंद्र चौधरी, गणेश पवार, श्रावणी वाघमारे आणि सुनील वाघमारे यांनी पाहिले.

शालेय मुलींना कराटेच्या माध्यमातून स्वसंरक्षणाचे कौशल्य आत्मसात करण्याची तसेच क्रीडा क्षेत्रात आपले कौशल्य दाखवण्याची संधी अशा स्पर्धांमुळे मिळत आहे. स्पर्धेच्या यशस्वी आयोजनासाठी क्रांतीश्वर बनकर, राहुल दोंदे, मयंक स्वामी, अजय वाघेला, लखन भगत आदींनी विशेष परिश्रम घेतले.कार्यक्रमाच्या शेवटी कराटे असोसिएशनचे जिल्हाध्यक्ष जी. के. वाघमारे सर यांनी आभार मानले.

सांगोला परिसर आणि राज्यातील बातम्या आणि माहिती सर्वात प्रथम मिळवण्यासाठी तुमच्या Whatsapp ग्रुपवर 78418 55301 हा आमचा नंबर समाविष्ट करा.
-
'सांगोला लाईव्ह'ला बातम्या व जाहिरात देण्यासाठी आजच संपर्क करा : 78418 55301
-
सोशल मीडियावर फॉलो करा -यूट्यूब, इन्स्टाग्राम आणि फेसबुक

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here