प्रा.सचिन सानप यांच्या प्रचार दौऱ्याला उत्साहपूर्ण प्रारंभ

0

शिक्षक, शिक्षक संघटना आणि शैक्षणिक संस्थांशी साधला संवाद; शिक्षकांच्या प्रश्नांवर केली चर्चा

सांगली (प्रतिनिधी) : पुणे विभाग शिक्षक मतदारसंघ निवडणूक २०२६ च्या पार्श्वभूमीवर उमेदवार सचिन नवनाथ सानप यांच्या सांगली जिल्ह्यातील प्रचार दौऱ्याला उत्साहपूर्ण प्रारंभ झाला. दौऱ्याच्या पहिल्याच दिवशी शिक्षक, शिक्षक संघटनांचे पदाधिकारी, शैक्षणिक संस्थांचे प्रतिनिधी तसेच विविध सामाजिक व राजकीय क्षेत्रांतील मान्यवरांशी संवाद साधत जनसंपर्क करण्यात आला.

या प्रचार दौऱ्यादरम्यान शिवसेनेचे जिल्हाप्रमुख श्री. संजय विभुते यांच्यासह विविध पदाधिकाऱ्यांशी चर्चा करण्यात आली. तसेच शिक्षक भारती संघटनेचे पदाधिकारी आणि विविध शिक्षक प्रतिनिधींशी संवाद साधून शिक्षण क्षेत्रातील प्रश्न, शिक्षकांच्या समस्या आणि त्यांच्या अपेक्षांबाबत विचारविनिमय करण्यात आला.

दरम्यान, सांगलीतील वालचंद कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग, चिंतामणराव कॉलेज ऑफ कॉमर्स आणि वेलिंग्टन कॉलेज येथे सदिच्छा भेट देण्यात आली. यावेळी संबंधित महाविद्यालयांचे प्राचार्य, विभागप्रमुख आणि प्राध्यापकांशी शिक्षकांच्या विविध प्रश्नांवर सविस्तर चर्चा करण्यात आली. या भेटींमधून शैक्षणिक क्षेत्रातील अडचणी समजून घेण्यावर आणि शिक्षकांच्या प्रश्नांना प्रभावीपणे वाचा फोडण्यावर भर देण्यात आला.

शिक्षकांचे प्रश्न, हक्क आणि मागण्या प्रभावीपणे विधानपरिषदेत मांडण्यासाठी कटिबद्ध असल्याचा निर्धार सचिन नवनाथ सानप यांनी व्यक्त केला. ‘शिक्षकांचा आमदार शिक्षकच हवा’ हा विचार शिक्षक बांधवांपर्यंत पोहोचवत त्यांच्या प्रश्नांसाठी सक्षम प्रतिनिधित्व करण्याची भूमिका त्यांनी मांडली.सांगली जिल्ह्यातील शिक्षकांनी दिलेला उत्स्फूर्त प्रतिसाद, आत्मीय स्वागत आणि व्यक्त केलेला विश्वास यामुळे प्रचार दौऱ्याला नवी ऊर्जा मिळाल्याचे सचिन सानप यांनी सांगितले.

या दौऱ्यादरम्यान उपस्थित शिक्षकांनी शिक्षण क्षेत्रातील विविध प्रश्न आणि समस्या मांडल्या. तसेच सचिन नवनाथ सानप यांच्या उमेदवारीला शुभेच्छा देत आगामी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सकारात्मक पाठिंबा व्यक्त केला.सांगली जिल्ह्यातील या प्रचार दौऱ्याच्या माध्यमातून शिक्षकांशी थेट संवाद साधत त्यांच्या समस्या जाणून घेण्यावर भर देण्यात आला असून, आगामी काळातही शिक्षकांच्या हक्कांसाठी आणि शिक्षण क्षेत्रातील प्रश्नांच्या सोडवणुकीसाठी जनसंपर्क सुरू ठेवण्याचा निर्धार व्यक्त करण्यात आला.

सांगोला परिसर आणि राज्यातील बातम्या आणि माहिती सर्वात प्रथम मिळवण्यासाठी तुमच्या Whatsapp ग्रुपवर 78418 55301 हा आमचा नंबर समाविष्ट करा.
-
'सांगोला लाईव्ह'ला बातम्या व जाहिरात देण्यासाठी आजच संपर्क करा : 78418 55301
-
सोशल मीडियावर फॉलो करा -यूट्यूब, इन्स्टाग्राम आणि फेसबुक

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here