माणगंगा परिवार अर्बन को-ऑपरेटिव्ह क्रेडिट सोसायटीचा चौथा वर्धापन दिन उत्साहात साजरा

0

सांगोला (प्रतिनिधी): माणगंगा परिवार अर्बन को-ऑपरेटिव्ह क्रेडिट सोसायटी, शाखा मंगळवेढा यांचा चौथा वर्धापन दिन शनिवार, दि. १४ नोव्हेंबर २०२६ रोजी मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. या निमित्ताने शाखेत सत्यनारायण महापूजेचे आयोजन करण्यात आले होते.

*सदर पूजाआपल्या संस्थेचे सभासद व राजनंदिनी मेडिकलचे मालक श्री. सुशांत माने-देशमुख साहेब व सौ. माधुरी माने-देशमुख मॅडम यांच्या शुभहस्ते संपन्न झाली. यावेळी संस्थेचे चेअरमन श्री. नितीन इंगोले साहेब व सौ. अर्चना ताई इंगोले मॅडम , संचालक श्री. विजय वाघमोडे साहेब, श्री. महादेव शिंदे साहेब, संस्थेचे खातेदार श्री. संभाजी सलगर सर, श्री. ज्ञानेश्वर शिंदे सर, श्री. संतोष गणेशकर साहेब आणि श्री. दादासो गायकवाड साहेब, तसेच संस्थेचे मुख्य कार्यकारी अधिकारी श्री. अक्षय मुढे सर उपस्थित होते. यावेळी संस्थेचे सर्व अधिकारी व कर्मचारीही उपस्थित होते.

*गेल्या चार वर्षांच्या यशस्वी वाटचालीत संस्थेने ग्राहकांचा विश्वास संपादन करून सहकार क्षेत्रात आपली वेगळी ओळख निर्माण केली आहे. ग्राहकांना उत्तम आर्थिक सेवा देणे, बचतीला प्रोत्साहन देणे आणि आर्थिक प्रगतीसाठी भक्कम व्यासपीठ उपलब्ध करून देणे, या उद्देशाने संस्था सातत्याने कार्यरत आहे.

*ग्राहकांचा विश्वास, संचालक मंडळाचे मार्गदर्शन आणि अधिकारी व कर्मचाऱ्यांचे योगदान हीच संस्थेच्या प्रगतीची खरी ताकद आहे.आगामी काळातही ग्राहकांना अधिक चांगल्या सेवा देत संस्थेच्या व्यवसायवाढीसाठी आणि प्रगतीसाठी सर्वांनी एकजुटीने कार्य करण्याचा निर्धार यावेळी व्यक्त करण्यात आला.सत्यनारायण महापूजा व वर्धापन दिनाचा कार्यक्रम आनंदी आणि उत्साहपूर्ण वातावरणात पार पडला.

माणगंगा परिवार — विश्वासाची चार वर्षे, प्रगतीची नवी दिशा!

सांगोला परिसर आणि राज्यातील बातम्या आणि माहिती सर्वात प्रथम मिळवण्यासाठी तुमच्या Whatsapp ग्रुपवर 78418 55301 हा आमचा नंबर समाविष्ट करा.
-
'सांगोला लाईव्ह'ला बातम्या व जाहिरात देण्यासाठी आजच संपर्क करा : 78418 55301
-
सोशल मीडियावर फॉलो करा -यूट्यूब, इन्स्टाग्राम आणि फेसबुक

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here