ऐतिहासिक गड-किल्ल्यांच्या प्रतिकृती; शहीद अशोक कामटे संघटना आयोजित किल्ले बांधणी स्पर्धेत इतिहासाचा जागर

0

 

सांगोला (प्रतिनिधी): ऐतिहासिक गड-किल्ल्यांचा वारसा नव्या पिढीपर्यंत पोहोचविण्यासह छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्वराज्य निर्मितीच्या इतिहासाची विद्यार्थ्यांना ओळख व्हावी, या उद्देशाने शहीद अशोक कामटे बहुउद्देशीय सामाजिक संघटना, सांगोला यांच्यावतीने किल्ले बांधणी स्पर्धा २०२६ चे आयोजन संस्थापक निलकंठ शिंदे सर यांच्या मार्गदर्शनाखाली आयोजन केले होते या 17 व्या स्पर्धेत विद्यार्थ्यांनी विविध ऐतिहासिक किल्ल्यांच्या आकर्षक प्रतिकृती साकारल्या. या स्पर्धेत 37 स्पर्धकांनी आपला सहभाग नोंदविला.


स्पर्धकांनी माती, दगड व पर्यावरणपूरक साहित्यांचा वापर करून किल्ल्यांच्या प्रतिकृती तयार केल्या. यामध्ये तटबंदी, बुरुज, प्रवेशद्वारे तसेच दुर्गरचनेचे बारकावे अचूकपणे मांडण्यात आले होते. प्रतिकृती साकारताना विद्यार्थ्यांनी संबंधित किल्ल्यांचा इतिहास व स्थापत्य वैशिष्ट्यांचाही अभ्यास केला. त्यामुळे स्पर्धेला कलात्मकतेसोबतच ऐतिहासिक अभ्यासाची जोड मिळाली.


स्पर्धेत अष्टविनायक मित्र मंडळ पुजारवाडी यांनी रायगडाची प्रतिकृती, अष्टविनायक ग्रुप जंजिरा किल्ल्याच्या प्रतिकृतीसाठी , तर किल्ले विजयदुर्ग राजवीर वाघ , कोरीगड स्वयंम गाडे , समर्थ काळे दुर्गराज रायगड, पन्हाळगड परीट गल्ली, शिवशक्ती ग्रुप कुंभार गल्ली, शिवनेरी निरज कुलकर्णी, सिंधुदुर्ग निखिल तारलेकर या स्पर्धकांना उत्कृष्ट किल्ले बांधणी केली ,किल्ल्याच्या प्रतिकृतीसाठी कामठे संघटनेकडून पारितोषिक देऊन गौरविण्यात येणार आहे.

ऐतिहासिक अचूकता, माहितीचे सादरीकरण, पर्यावरणपूरक साहित्यांचा वापर, सर्जनशीलता आणि प्रतिकृतीची रचना या निकषांवर स्पर्धेचे परीक्षण करण्यात आले. मकरंद पाटील, मयूर ढोले, प्रा प्रसाद खडतरे
, अनिल साळुंके यांनी परीक्षक म्हणून काम पाहिले.

मोबाईल व डिजिटल मनोरंजनाच्या वाढत्या प्रभावाच्या पार्श्वभूमीवर विद्यार्थ्यांना प्रत्यक्ष कृतीतून इतिहासाची गोडी लावणारा हा उपक्रम ठरला. किल्ले बांधणीच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना ऐतिहासिक वारशाची माहिती मिळण्याबरोबरच दुर्गस्थापत्य, नियोजन आणि सर्जनशीलतेचा अनुभव घेता आला. गड-किल्ल्यांच्या संवर्धनाबाबत जागृती निर्माण करण्याच्या दृष्टीनेही हा उपक्रम महत्त्वपूर्ण ठरला.

सदर किल्ले स्पर्धा पारितोषिक वितरण समारंभ 26/11रोजी शहीद दिनानिमित्त संघटनेच्या स्टेशन रोड येथील कार्यालयात चार वाजता संपन्न होणार आहे तरी सर्व स्पर्धकांनी वेळेवर उपस्थित राहावे.
स्पर्धेच्या यशस्वी आयोजनासाठी अशोक कामटे संघटनेच्या सदस्यांनी य परिश्रम घेतले.

सांगोला परिसर आणि राज्यातील बातम्या आणि माहिती सर्वात प्रथम मिळवण्यासाठी तुमच्या Whatsapp ग्रुपवर 78418 55301 हा आमचा नंबर समाविष्ट करा.
-
'सांगोला लाईव्ह'ला बातम्या व जाहिरात देण्यासाठी आजच संपर्क करा : 78418 55301
-
सोशल मीडियावर फॉलो करा -यूट्यूब, इन्स्टाग्राम आणि फेसबुक

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here