आलदर हॉस्पिटलच्या वतीने उदनवाडी येथे मोफत आरोग्य शिबिराचे आयोजन 

0

सांगोला (प्रतिनिधी): सांगोला शहरातील सुप्रसिद्ध आलदर हॉस्पिटल यांच्या वतीने बालकांसाठी मोफत आरोग्य शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. हे शिबिर शनिवार, दि. १२ सप्टेंबर २०२६ रोजी सकाळी ११ ते दुपारी १ वाजेपर्यंत जिल्हा परिषद प्राथमिक शाळा, उदनवाडी, सांगोला येथे आयोजित करण्यात आले आहे.

या शिबिरामध्ये जन्मलेल्या बाळापासून ते १८ वर्षांपर्यंतच्या रुग्णांची मोफत आरोग्य तपासणी करण्यात येणार आहे. तपासणीसोबतच गरजेनुसार रुग्णांना मोफत औषधेही देण्यात येणार आहेत. त्यामुळे लहान बालकांपासून किशोरवयीन मुलांपर्यंतच्या रुग्णांसाठी हे शिबिर उपयुक्त ठरणार आहे.

या शिबिरासाठी डॉ. महावीर आलदर (एम.डी., बालरोग तज्ज्ञ) यांचे मार्गदर्शन व वैद्यकीय सेवा लाभणार आहे. रुग्णांची तपासणी करून त्यांच्या आरोग्यविषयक समस्यांबाबत आवश्यक मार्गदर्शन करण्यात येणार आहे.

तसेच महात्मा ज्योतिराव फुले जन आरोग्य योजना व प्रधानमंत्री आयुष्मान भारत योजना यांच्या माध्यमातून पात्र लाभार्थ्यांना मोफत शस्त्रक्रिया व औषधोपचाराची सुविधा उपलब्ध करून देण्यात येणार आहे. गरजू रुग्णांनी या योजनांचा लाभ घेण्यासाठी शिबिराला उपस्थित राहावे, असे आवाहन करण्यात आले आहे.

ग्रामीण व परिसरातील नागरिकांना दर्जेदार आरोग्यसेवा उपलब्ध व्हावी, तसेच लहान मुलांच्या आरोग्याच्या समस्यांचे वेळेवर निदान व उपचार मिळावेत, या उद्देशाने या शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे.उदनवाडी तसेच परिसरातील १८ वर्षांपर्यंतच्या बालकांनी या मोफत आरोग्य शिबिराचा मोठ्या संख्येने लाभ घ्यावा, असे आवाहन आलदर हॉस्पिटलच्या वतीने करण्यात आले आहे. अधिक माहितीसाठी 9029044009 या नंबरवर वर संपर्क करावा.

सांगोला परिसर आणि राज्यातील बातम्या आणि माहिती सर्वात प्रथम मिळवण्यासाठी तुमच्या Whatsapp ग्रुपवर 78418 55301 हा आमचा नंबर समाविष्ट करा.
-
'सांगोला लाईव्ह'ला बातम्या व जाहिरात देण्यासाठी आजच संपर्क करा : 78418 55301
-
सोशल मीडियावर फॉलो करा -यूट्यूब, इन्स्टाग्राम आणि फेसबुक

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here