उपनगराध्यक्ष नितीन इंगोले यांच्या वाढदिवसानिमित्त भव्य मोफत महाआरोग्य तपासणी शिबिराचे आयोजन 

0

विविध आजारांवर तज्ज्ञ डॉक्टरांकडून तपासणी व उपचाराची सुविधा

सांगोला (प्रतिनिधी): सांगोला तालुका शिवसेना आणि माणगंगा परिवार यांच्या संयुक्त विद्यमाने माणगंगा परिवारचे संस्थापक अध्यक्ष तथा सांगोला नगरपालिकेचे उपनगराध्यक्ष मा. श्री. नितीन (आबासाहेब) इंगोले यांच्या वाढदिवसानिमित्त सांगोला येथे भव्य मोफत महाआरोग्य तपासणी शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. नागरिकांच्या आरोग्याची काळजी घेत विविध आजारांचे निदान, तज्ज्ञ डॉक्टरांचे मार्गदर्शन तसेच आवश्यक उपचार आणि औषध वितरणाची सुविधा या शिबिराच्या माध्यमातून उपलब्ध करून देण्यात येणार आहे.

हे महाआरोग्य शिबिर मंगळवार, दि. १५ सप्टेंबर २०२६ रोजी सकाळी १० ते सायंकाळी ५ वाजेपर्यंत माणगंगा अॅग्रो मार्ट, वाढेगांव रोड, कडलास नाका, सांगोला येथे आयोजित करण्यात आले आहे. या शिबिराचे वैशिष्ट्य म्हणजे विविध वैद्यकीय विभागांतील तज्ज्ञांकडून नागरिकांची तपासणी करण्यात येणार आहे. यामध्ये मेडिसिन, त्वचारोग, हृदयरोग, स्त्रीरोग, मूत्ररोग, बालरोग, सर्जरी, अस्थिरोग तसेच कान-नाक-घसा या विभागांचा समावेश आहे. त्यामुळे विविध प्रकारच्या आरोग्यविषयक समस्यांसाठी नागरिकांना एकाच ठिकाणी प्राथमिक तपासणी व तज्ज्ञांचे मार्गदर्शन मिळणार आहे.

याशिवाय नेत्ररोग विभागामार्फत नॅब नेत्र रुग्णालय, मिरज यांच्या सहकार्याने मोफत नेत्र तपासणी करण्यात येणार आहे. डोळ्यांच्या आजारांबाबत आवश्यक तपासणी व मार्गदर्शन नागरिकांना मिळणार आहे. गरजू रुग्णांना मोफत चष्मे वाटप करण्यात येणार आहे. तसेच पात्र रुग्णांसाठी मोफत मोतीबिंदू शस्त्रक्रियेची सुविधा उपलब्ध करून देण्यात येणार आहे.

शिबिरामध्ये मोफत रक्त तपासणी, रक्तातील शुगर तपासणी आणि ईसीजीची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे. आरोग्य तपासणीदरम्यान आवश्यकतेनुसार डॉक्टरांकडून पुढील उपचारांबाबत मार्गदर्शन केले जाणार आहे. तसेच तपासणीनंतर आवश्यक असलेल्या रुग्णांना मोफत औषधांचे वितरण करण्यात येणार आहे.महाआरोग्य तपासणी शिबिरासोबतच रक्तदान शिबिराचेही आयोजन करण्यात आले आहे. नागरिकांनी सामाजिक बांधिलकी जपत रक्तदान करून या उपक्रमात सहभागी व्हावे, असे आवाहन करण्यात आले आहे.

सांगोला तालुक्यातील नागरिकांनी आपल्या कुटुंबीयांसह या भव्य मोफत महाआरोग्य तपासणी शिबिरात सहभागी होऊन आरोग्याची तपासणी करून घ्यावी, असे आवाहन सांगोला तालुका शिवसेना आणि माणगंगा परिवार यांच्या वतीने करण्यात आले आहे.

 

सांगोला परिसर आणि राज्यातील बातम्या आणि माहिती सर्वात प्रथम मिळवण्यासाठी तुमच्या Whatsapp ग्रुपवर 78418 55301 हा आमचा नंबर समाविष्ट करा.
-
'सांगोला लाईव्ह'ला बातम्या व जाहिरात देण्यासाठी आजच संपर्क करा : 78418 55301
-
सोशल मीडियावर फॉलो करा -यूट्यूब, इन्स्टाग्राम आणि फेसबुक

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here