सांगोला तालुक्यात दुष्काळी परिस्थितीची पालकमंत्री जयकुमार गोरे यांच्याकडून पाहणी

0

कटफळ येथे पीक नुकसानीची पाहणी; पंचनामे जलदगतीने पूर्ण करण्याच्या प्रशासनाला सूचना

सांगोला (प्रतिनिधी): सोलापूर जिल्ह्यातील सर्व ११ तालुक्यांत दुष्काळ जाहीर करण्यात आला असून, या पार्श्वभूमीवर सांगोला तालुक्यातील कटफळ येथे पालकमंत्री मा. जयकुमार गोरे यांनी दुष्काळामुळे झालेल्या पीक नुकसानीची प्रत्यक्ष पाहणी केली. यावेळी त्यांनी शेतकऱ्यांशी संवाद साधून त्यांच्या अडचणी तसेच पिकांच्या नुकसानीची माहिती जाणून घेतली.

पीक नुकसानीचे पंचनामे जलदगतीने पूर्ण करण्याच्या सूचना प्रशासनाला देण्यात आल्या आहेत. पंचनामे पूर्ण होईपर्यंत नुकसानग्रस्त पिकांवर रोटावेटर फिरवू नये, असे आवाहन पालकमंत्री गोरे यांनी शेतकऱ्यांना केले. नुकसानग्रस्त एकही पीक पंचनाम्यापासून वंचित राहणार नाही, याची दक्षता घेण्याचे निर्देशही त्यांनी प्रशासनाला दिले.

दुष्काळाच्या पार्श्वभूमीवर तालुक्यात पाणीपुरवठा, चारा तसेच इतर आवश्यक उपाययोजना सुरू करण्यात आल्या आहेत. शेतकऱ्यांना आवश्यक सुविधा व मदत वेळेत उपलब्ध करून देण्यासाठी प्रशासनाने तातडीने कार्यवाही करावी, अशा सूचनाही यावेळी देण्यात आल्या.

यावेळी आमदार बाबासाहेब देशमुख, माजी आमदार दीपक साळुंखे-पाटील, माजी आमदार शहाजी बापू पाटील, मुख्य कार्यकारी अधिकारी कुशल जैन, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी संदीप कोहिनकर, प्रांताधिकारी अमित माळी, तहसीलदार बाळूताई भागवत, तालुका कृषी अधिकारी दिपाली जाधव, गट विकास अधिकारी अमोल जाधव, योगेश कांबळे तसेच ग्रामस्थ उपस्थित होते.

शेतकऱ्यांच्या अडचणीच्या काळात शासन त्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे आहे. राजकारण न करता शेतकऱ्यांना आवश्यक मदत व दिलासा देण्यासाठी शासनाकडून तातडीने उपाययोजना करण्यात येत असल्याचे यावेळी सांगण्यात आले.

सांगोला परिसर आणि राज्यातील बातम्या आणि माहिती सर्वात प्रथम मिळवण्यासाठी तुमच्या Whatsapp ग्रुपवर 78418 55301 हा आमचा नंबर समाविष्ट करा.
-
'सांगोला लाईव्ह'ला बातम्या व जाहिरात देण्यासाठी आजच संपर्क करा : 78418 55301
-
सोशल मीडियावर फॉलो करा -यूट्यूब, इन्स्टाग्राम आणि फेसबुक

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here