✒️ सरकारी कर्मचारी, शिक्षक आजपासून बेमुदत संपावर
▪️रुग्णसेवेसह शासकीय कामांवर मोठा परिणाम होण्याची शक्यता
▪️राज्य सरकारने दिला कारवाईचा इशारा
▪️वर्षभरात सात आंदोलने करूनही दुर्लक्ष
✒️ महिला आरक्षणावरून कलगीतुरा
▪️आरक्षणाच्या समर्थनार्थ १ कोटी सह्या गोळा करणार : मुख्यमंत्री फडणवीस
▪️खुल्या चर्चेस काँग्रेस तयार : प्रणिती शिंदे
▪️अडीच वर्षांपासून आरक्षणाची अंमलबजावणी का नाही?: सुप्रिया सुळे
▪️पंतप्रधान मोदींनाही खुल्या चर्चेला आणा – प्रणिती शिंदे
✒️ पंतप्रधान मोदींच्या दौऱ्याआधीच राजस्थानमधील रिफायनरीला आग
▪️लोकार्पणाआधी मोठी दुर्घटना; सुरक्षा यंत्रणा अलर्ट
✒️ अमली पदार्थांची तस्कर अश्विनी पॉल अटकेत
✒️ अमेरिका-इराण शांतता चर्चेच्या दुसऱ्या फेरीवर अनिश्चिततेचे सावट
▪️युद्धबंदीची मुदत आज संपणार; बैठकीकडे संपूर्ण जगाचे लक्ष
✒️ लोकल विलंबाने हाल
▪️डोंबिवली स्थानकाजवळ डबा घसरला अनेक लोकल रद्द, सेवा विस्कळीत; प्रवाशांची कसरत

✒️ उधमपूरमध्ये बस दरीत कोसळून २१ प्रवाशांचा मृत्यू
✒️ मराठी सक्तीविरोधात राज्यभर निदर्शने
▪️४ मेपासून शहरी, ग्रामीण भागांमध्ये रस्त्यावर उतरणार
▪️रिक्षा-टॅक्सीचालकांच्या स्वाक्षऱ्यांचे निवेदन देण्यात येणार
✒️ ९ आयपीएस अधिकाऱ्यांच्या बदल्या
▪️सातारा पोलीस अधीक्षक तुषार दोशी यांची बदली
✒️ रिक्षाचालकांना मराठी बोलता आलीच पाहिजे !
▪️मराठी सक्तीवर परिवहन मंत्री ठाम
▪️१ मेपासून मोहीम होणार सुरू
✒️ जात प्रमाणपत्रावरून सुरू असलेला वाद हे विरोधकांचे षड्यंत्र
▪️एमआयएम नगरसेविकेच्या वडिलांचा आरोप
✒️ राज्य सरकारचे बुवाबाजीला खतपाणी
▪️बुवाबाजीविरोधी परिषदेत प्रा. श्याम मानव यांचा आरोप
✒️ भारत-दक्षिण कोरिया ‘सेपा’ करार
▪️वाटाघाटी सुरू करण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय
✒️ द्रुतगती महामार्ग हे मृत्यूचे सापळे बनू नयेत
▪️सर्वोच्च न्यायालयाचे देशभरासाठी महत्त्वपूर्ण निर्देश

✒️ मणिपूर निषेध मोर्चातील हिंसाचारः २१ जणांना अटक
✒️ सुभाषचंद्र बोस यांना ‘राष्ट्रपुत्र’ घोषित करा
▪️सर्वोच्च न्यायालयाने याचिका फेटाळली
✒️ जपानमध्ये ७.५ रिश्टर स्केलचा शक्तिशाली भूकंप
▪️त्सुनामीचा इशारा
✒️ राज्यांच्या खर्चाचा वेग मंदावणार
▪️२०२६-२७ मध्ये वाढ ८-१० टक्क्यांवर राहण्याचा अंदाज
✒️ शेअर बाजारात सत्रादरम्यान चढ-उतार
✒️ गोलंदाजांची आज अग्निपरीक्षा
▪️सनरायजर्स हैदराबाद आणि दिल्ली कॅपिटल्सच्या फलंदाजांमध्ये जुगलबंदी
✒️ शेवटी मुंबईचा स्वाभिमान जागा झाला!
▪️विजयासाठी आसुसलेल्या ‘पलटण’ला तिलक वर्माने दिले बळ; बालेकिल्ल्यात गुजरातचा धुव्वा
▪️गुजरातचा 99 धावांनी धुव्वा, शुबमनसेनेचा हिशोब

✒️ सांगोला येथे भगवान परशुराम जन्मोत्सव उत्साहात साजरा
▪️विविध सामाजिक उपक्रम उत्साहात संपन्न
✒️ सांगोला तालुका तलाठी संघटनेचा आज पासून बेमुदत संप
✒️ सांगोला येथे महात्मा बसवेश्वर जयंती निमित्त विविध कार्यक्रम संपन्न
▪️शहरातील सर्व महापुरुषांना पुष्पहार अर्पण
✒️ अखंड महाराष्ट्र रेल्वे परिषदेचे २६ एप्रिल रोजी दादर येथे आयोजन
▪️सोलापूर विभागातील रेल्वे मागण्या व समस्या प्रभावीपणे मांडणार-अशोक कामटे संघटना
✒️ वासुद येथे वृक्षारोपण कार्यक्रम संपन्न

सांगोला परिसर आणि राज्यातील बातम्या आणि माहिती सर्वात प्रथम मिळवण्यासाठी तुमच्या Whatsapp ग्रुपवर 78418 55301 हा आमचा नंबर समाविष्ट करा.
-
'सांगोला लाईव्ह'ला बातम्या व जाहिरात देण्यासाठी आजच संपर्क करा : 78418 55301
-
सोशल मीडियावर फॉलो करा -यूट्यूब, इन्स्टाग्राम आणि फेसबुक



