नृसिंह गणेश मंडळाच्या सामाजिक कार्याला न्यायाधीशांची शाबासकी

0

अकोल्याचे जिल्हा न्यायाधीश-2 तेजवंतसिंग संधू यांच्याकडून मंडळाला आर्थिक मदत

सांगोला : गणेशोत्सवाच्या माध्यमातून सामाजिक बांधिलकी जपत समाजातील गरजू घटकांसाठी विविध समाजोपयोगी उपक्रम राबविणार्‍या नृसिंह तरुण गणेश मंडळ, लोहार गल्ली, सांगोला यांच्या कार्याची दखल घेत अकोला येथील जिल्हा न्यायाधीश-2 तथा सत्र न्यायाधीश श्री. तेजवंतसिंग संधू यांनी मंडळाच्या उपक्रमांचे कौतुक केले. तसेच परमपिता परमेश्वराच्या कृपेने मंडळाच्या सामाजिक कार्यासाठी 2 हजार 100 रुपयांची धनराशी योगदान म्हणून पाठविली.

नृसिंह गणेश मंडळाच्या वतीने यंदाच्या गणेशोत्सवानिमित्त पारंपरिक उत्सवासोबतच सामाजिक उपक्रमांना विशेष प्राधान्य देण्यात आले आहे. दिव्यांग बांधवांच्या नावावर दाम दुप्पट योजनेअंतर्गत 5 हजार रुपयांची मुदतठेव, गरजू महिलांना शिलाई मशीनचे वाटप, झोपडपट्टी परिसरातील चिमुकल्या विद्यार्थ्यांची मोफत आरोग्य तपासणी व औषधोपचार, तसेच गरजू कुटुंबांना शेळ्यांचे वाटप असे विविध उपक्रम मंडळाच्या माध्यमातून राबविण्यात येत आहेत.

विशेष म्हणजे, श्री.तेजवंतसिंग संधू हे 2009 ते 2012 या कालावधीत सांगोला येथे दिवाणी न्यायाधीश कनिष्ठ स्तर म्हणून कार्यरत होते. सांगोल्यातील आपल्या कार्यकाळाच्या आठवणींशी जोडलेले नाते आणि मंडळाच्या सामाजिक कार्याची माहिती मिळाल्यानंतर त्यांनी या उपक्रमाला आपले योगदान दिले. त्यामुळे त्यांच्या या सहकार्याला मंडळाच्या कार्यकर्त्यांनी विशेष महत्त्व दिले आहे.

मंडळाच्या या उपक्रमांची माहिती मिळाल्यानंतर श्री.तेजवंतसिंग संधू यांनी मंडळाच्या सामाजिक कार्याचे कौतुक करत 2 हजार 100 रुपयांचे योगदान दिले. त्यांच्या या सहकार्यामुळे मंडळाच्या कार्यकर्त्यांचा उत्साह वाढला आहे.

 

समाजसेवेचे कार्य असेच निरंतर सुरू राहावे

नृसिंह तरुण गणेश मंडळाच्या समाजाप्रती असलेल्या संवेदनशीलतेचे मनापासून कौतुक आहे. दिव्यांग बांधवांसाठी मुदतठेव, गरजू महिलांना शिलाई मशीनचे वाटप, विद्यार्थ्यांची आरोग्य तपासणी व मोफत औषधोपचार, तसेच गरजू कुटुंबांना शेळ्यांचे वाटप अशा विविध उपक्रमांतून मंडळाने गणेशोत्सवाला समाजसेवेची जोड दिली आहे. मंडळाकडून सुरू असलेले हे समाजोपयोगी कार्य असेच निरंतर सुरू राहावे आणि समाजातील गरजू घटकांना त्याचा लाभ मिळत राहावा, हीच परमपिता परमेश्वराकडे प्रार्थना.

– श्री. तेजवंतसिंग संधू

जिल्हा न्यायाधीश-2 तथा सत्र न्यायाधीश, अकोला

सांगोला परिसर आणि राज्यातील बातम्या आणि माहिती सर्वात प्रथम मिळवण्यासाठी तुमच्या Whatsapp ग्रुपवर 78418 55301 हा आमचा नंबर समाविष्ट करा.
-
'सांगोला लाईव्ह'ला बातम्या व जाहिरात देण्यासाठी आजच संपर्क करा : 78418 55301
-
सोशल मीडियावर फॉलो करा -यूट्यूब, इन्स्टाग्राम आणि फेसबुक

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here